दोन दशकांपूर्वी दूरवर पसरलेल्या वाळवंटात एका अशा जागेचा शोध लागला, जे ठिकाण आठवे आश्चर्यच जणू! कारण येथे वाळवांच्या कातळात एक भव्य शहर वसवले गेले आहे. हे शोध फार हजारो-शतकांपूर्वी नाही, अगदी १८१२ साली जोहान लुडविग बर्कहार्ट यांनी एका प्रवासादरम्यान लावले आहे. नकळत घडलेला तो इतिहास!
फोटो सौजन्य - Social Media

जॉर्डनच्या वाळवंटात जोहान लुडविग बर्कहार्ट आपल्या उंटावरून प्रवास करत होते. त्या प्रवासादरम्यान जोहान चुकून एका अशा अरुंद वाटेत पोहचतो, ज्यातून बाहेर निघाल्यावर तो अशा ठिकाणी पोहचतो जे पाहून तो पाहतच राहतो.

त्याच्या समोर जवळजवळ दीडशे फुटी उंच कातळात कोरलेले महाद्वार असते. तिथे जे शहर वास्तव्यास असते, ती दोन हजार वर्षांपूर्वी तेथील लोकांची विचार करण्याची शक्ती अंदाज लावण्याच्या पलीकडची असते.

त्या शहरात कातळात कोरलेल्या अनेक खोल्या असतात, जे बघताच क्षणी एका शवगृहाची आठवण करून देते, कदाचित तेथे मेलेल्या माणसांचे शव ठेवण्यात येत असावे.

या शहराला आज पेट्रा या नावाने ओळखले जाते. नबातीयन लोकांनी वसवलेले हे शहर अनोखे आहे कारण हे शहर कातळात वसवले असून याचे बांधकाम शिखरापासून तळापर्यंत उलटे करण्यात आले आहे.

हे शहर त्या काळी किती समृद्ध असेल याची खात्री या शहरांमध्ये असणाऱ्या सुविधांवरूनच बसून येते. भर वाळवंटात या ठिकाणी पाण्याची सोयही उपल्बध होती, धरणे होते.






