नरक म्हणजे भयंकर जागा! वाईट कर्म केले की शिक्षा भोगण्यासाठी येथे पाठवले जाते असा लोकांचा समज आणि श्रद्धा आहे. पण पृथ्वीवर असे काही ठिकाणे आहेत, ज्यांचा सरळ संबंध नरकाशी लावला जातो. या जागा ज्वालामुखी आहेत तर विशाल पर्वत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात या जागांविषयी:
फोटो सौजन्य - Social Media
Iceland या देशामध्ये स्थित Hekla Volcano नरकामध्ये जाण्याचा मार्ग म्हणून ओळखला जायचा, कालांतराने याबद्दलच्या विचारसरणी बदलत गेल्या.
तुर्कीमध्ये स्थित असलेले Pluto's Gate पाताळात जाण्याचा मार्ग म्हणून ओळखले जाते, हे फार प्राचीन ठिकाण आहे.
Nicaragua येथील Masaya Volcano ही अशी ज्वालामुखी आहे, जिच्या संबंधित असे म्हंटले जाते की हा पाताळात जाण्याचा मार्ग आहे.
दिसायला स्वर्गाची अनुभूती देणारा जपानचा Mount Osore चा संबंध नरकाशी जोडला जातो. येथील निसर्ग नयनरम्य आहे.
तुर्कमेनिस्तान मध्ये स्थित असलेले Darvaza Gas Crater येथील सतत जळणाऱ्या आगीमुळे या ठिकाणाला नरकाच्या संबंधित असल्याचे सांगितले जाते.