आज आम्ही तुम्हाला इटलीमध्ये घडून आलेल्या एका अशा घटनेची माहिती देत आहोत जे वाचताच तुमच्या अंगाचा थरकाप उडेल. एक अशी घटना जिने संपूर्ण शहराला केलं उद्ध्वस्त आणि सर्वच झालं नष्ट. शहरातील प्रत्येकजण, मानवांपासून प्राण्यांपर्यंत अचानक सांगाड्यात बदलले आणि त्यावेळी नक्की काय घडलं ते चला जाणून घऊया.
ती एक घटना अन् संपूर्ण शहर झालं उद्ध्वस्त! मानवच काय तर प्राणीही राहिले नाही; रक्त उकळलं, कवट्या फुटल्या....

आपण ज्या शहराविषयी बोलत आहोत त्या शहराचे नाव पोम्पेई आहे. हे शहर १९४० वर्षांपूर्वी इटलीमध्ये वसले होते. इथे शेकडो वर्षांपूर्वी एक आपत्तीजनक घटना घडली ज्यामुळे संपूर्ण शहर एका क्षणातच उद्ध्वस्त झाले.

हे शहर १७० एकरमध्ये पसरलेले आहे. इथे त्याकाळी सुमारे ११,००० ते १५,००० लोक राहत होते. पण एका व्यापक विनाशामुळे हे सर्वच लोक सांगाड्यात रुपांतरीत झाले.

खरं तर, नेपल्सच्या उपसागरात, पॉम्पेईजवळ, माउंट व्हेसुव्हियस नावाचा एक ज्वालामुखी आहे. ७९ इसवी सनात, या ज्वालामुखीचा अचानक उद्रेक झाला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात लावा, राख आणि वायू बाहेर पडला.

पोम्पेई शहरात राहणारे रहिवासी आपला जीव वाचवून तेथून पळतील याआधीच ज्वालामुखीचा लावा त्या भागात पोहचतो आणि सर्वांचा झटक्यातच सर्वनाश होतो. तो लावा इतका गरम असतो की यात लोकांचे रक्त उकळले तर काहींच्या कवट्या फुटल्या

लावामुळे लोकांचा वेदनादायी मृत्यू झाला. नंतर तापमान अचानक कमी झाले ज्यामुळे लावा घट्ट झाला आणि लोकांचे शरीर दगडात रुपांतरीत झाले. पॉम्पेई व्यतिरिक्त, ज्वालामुखीने हर्क्युलेनियम या आणखीन एका लहान शहराचा नाश केला.

पोम्पेई आणि हर्क्युलेनियम या दोन्ही शहरांना सध्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादित सामील करण्यात आले आहे. लोकांसाठी ती अजूनही रहस्यमयी गूढ आहेत.






