Christmas banned Countries: आज 25 डिसेंबर रोजी संपूर्ण जग ख्रिसमस साजरा करण्यात व्यस्त आहे. पण जगात असे काही देश आहेत ज्यात ख्रिसमस साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी आहे. विविध कारणांमुळे येथे ख्रिसमस साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये कोणकोणत्या देशांचा समावेश आहे?चला जाणून घेऊयात.
संपूर्ण जग ख्रिसमस साजरा करत आहे पण या 6 देशांमध्ये या सणावर आहे कडक बंदी! असे का? जाणून घ्या

उत्तर कोरियामध्ये धार्मिक कार्यांशी संबंधित प्रत्येक कामावर कडक नजर ठेवली जाते. यामुळेच उत्तर कोरियामध्ये ख्रिसमस साजरा करण्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडल्यास इथे कठोर शिक्षाही आहे

लिबियामध्येही ख्रिसमस साजरा करण्यावर कडक निर्बंध आहेत. येथे धार्मिक अल्पसंख्याक आणि परदेशी चालीरीतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्यांचे सण साजरे करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे येथे ख्रिसमस साजरा करण्यासही बंदी घालण्यात आली आहे

ताजिकिस्तानमध्येही ख्रिसमस साजरा करण्यास सक्त मनाई आहे. इथे लोक नाताळला कोणताही सार्वजनिक सण साजरा करू शकत नाहीत

भूतानमध्ये कोणताही गैर-बौद्ध आणि गैर-हिंदू सण साजरा करण्यावर बंदी आहे. येथे सर्वात जास्त लोकसंख्या बौद्धांची आहे आणि त्यांच्यानंतर हिंदूंचा दुसरा क्रमांक लागतो. येथे धार्मिक स्थळे बांधण्यास आणि सार्वजनिक ठिकाणी धार्मिक सण साजरे करण्यास मनाई आहे

ब्रुनेईमध्ये इस्लामशिवाय इतर कोणत्याही धर्माच्या प्रचारावर बंदी असल्याने ख्रिसमस साजरा करण्यावरही बंदी आहे. ब्रुनेईच्या सुलतानची गणना पृथ्वीवरील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये केली जाते






