गाजर हिवाळ्यात मिळत असले तरी आजकाल ही भाजी वर्षभर उपलब्ध असते. आपल्याकडेच नेहमीच गाजरपासून बनलेला पदार्थ खास प्रसंगाच्या वेळीच बनतो. हा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा. पण फक्त असेच गाजर खाल्ल्याने सुद्धा आपल्याला अनेक फायदे होऊ शकतात. गाजरात भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात. याच्या सेवनाने डोळे, यकृत, किडनी आणि शरीराच्या इतर अवयवांनाही खूप फायदा होतो. चला जाणून घेऊया, गाजर खाण्याचे फायदे.
जाणून घ्या गाजर खाण्याचे गुणकारी फायदे (फोटो सौजन्य: Freepik)
गाजर ही मूळ भाजी आहे जी पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये 900 AD च्या आसपास उगवली गेली. 15 व्या किंवा 16 व्या शतकाच्या आसपास मध्य युरोपमध्ये गाजर विकसित होत गेले.
गाजर डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण त्यात व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते आणि अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन नावाचे दोन कॅरोटीनॉइड असतात.
गाजरात भरपूर फायबर असते जे रक्तातील साखर आणि इन्सुलिनसाठी खूप चांगले असते. कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, जे शुगर बॅलन्स राहण्यास मदत करते.
गाजराची सर्वात खास गोष्ट म्हणजे त्यात 88 टक्के पाणी असते. त्यात फायबर आणि रौगेज असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
जर तुमचे बीपी जास्त असेल तर तुम्ही दररोज 1 गाजर खायला पाहिजे. गाजरात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. जे बीपी संतुलित ठेवण्याचे काम करते व तुम्हाला एक निरोगी आयुष्य जगण्यास मदत करते.