सकाळी उठल्यानंतर लहान मुलांची शाळेत जाण्याची घाई, तर घरातील सदस्यांची ऑफिसला जाण्याची घाई असते. अशावेळी कुकरचा वापर करून झटपट पदार्थ बनवले जातात. घाईगडबडीच्या वेळी कोणताही पदार्थ लगेच तयार करण्यासाठी कुकरचा वापर केला जातो. मात्र कुकरमध्ये सर्वच पदार्थ शिजवू नये. कुकरचा वापर पदार्थ शिजवण्यासोबतच वाफवण्यासाठी आणि बेकिंगसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कुकरमध्ये कोणते पदार्थ शिजवू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ कुकरमध्ये शिजवल्यास आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहचू शकते. (फोटो सौजन्य – iStock)
कुकरमध्ये शिजवलेले 'हे' पदार्थ आतड्यांमध्ये तयार करतील भयानक विष
घरी आणलेल्या हिरव्या पालेभाज्या कधीच कुकरमध्ये शिजवू नये. यामुळे भाज्यांमधील आवश्यक पोषक घटक नष्ट होतात. हिरव्या भाज्यांमध्ये विटामिन सी, लोह, कॅल्शियम, विटामिन ए इत्यादी घटक हिरव्या पालेभाज्यांमध्ये असतात.
कुकरमध्ये केक कधीही बनवू नये. कुकरचा वापर अन्नपदार्थ शिजवण्यासाठी केला जातो. कुकरमध्ये केक व्यवस्थित बेक होत नाही.
दूध किंवा दुधापासून तयार केलेले जाणारा पदार्थ बनवण्यासाठी कढई किंवा टोपाचा वापर करावा. मात्र काहींना कुकरमध्ये दूध गरम करण्याची सवय असते. यामुळे दुधाची चव खराब होऊन जाते.
घाईगडबडीच्या वेळी एखादा पदार्थ तळण्यासाठी अनेक लोक कुकरचा वापर करतात. पण कुकरचा वापर करणे चुकीचे आहे. कुकरच्या वापरामुळे पदार्थाची चव खराब होऊन जाते.
लहान मुलांसह मोठ्यांना पास्ता किंवा नूडल्स खायला खूप आवडतात. पण नूडल्स किंवा पास्ता बनवताना कुकरचा वापर करू नये. यामध्ये पदार्थ जास्त शिजला जातो आणि चव खराब होण्याची शक्यता असते.