दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी आरोग्य बिघडवण्याचे कारण बनतात. अतितिखट किंवा तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला त्रास होण्याची शक्यता असते. कारण या पदार्थांमधील खराब कोलेस्ट्रॉल शरीराच्या रक्तवाहिन्यांमध्ये जमा होण्यास सुरुवात होते. शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल आरोग्यासाठी अतिशय घटक आहे. दैनंदिन आहारातील काही पौष्टिक पदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे काम करतात. म्हणून आज आम्ही तुम्हाला रोजच्या आहारात खाल्ले जाणारे कोणते पदार्थ शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
दैनंदिन आहारातील 'हे' पदार्थ शरीरात वाढवतात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी
मसालेदार किंवा जास्त तिखट पदार्थांचे रोजच्या आहारात सेवन करू नये. या पदार्थांच्या अतिसेवनामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच खराब कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढण्याची जास्त शक्यता असते.
धावपळीच्या जीवनशैलीमुळे सगळ्यांचं प्रक्रिया केलेले आणि जलद तयार होणारे पदार्थ रेडी-टू-ईट किंवा पॅकेज्ड स्नॅक्स इत्यादी पदार्थ खाण्यास जास्त आवडते. मात्र हेच पदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
चिप्स, फ्रेंच फ्राईज, समोसे, कचोरी इत्यादी भरपूर तेलाचा वापर करून तळलेले पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. या पदार्थांचे आहारात जास्त सेवन करू नये. यामुळे खराब कोलेस्ट्रॉल वाढू लागते.
सॉसेज, सलामी, बेकन आणि हॉट डॉग्स इत्यादी मासे प्रक्रिया करून बनवले जातात. या माश्यांमध्ये सोडियम आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त आढळून येते, ज्यामुळे शरीरात खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जीवनशैलीमुळे सगळ्यांचं प्रक्रिया केलेले आणि जलद तयार होणारे पदार्थ रेडी-टू-ईट किंवा पॅकेज्ड स्नॅक्स इत्यादी पदार्थ खाण्यास जास्त आवडते. मात्र हेच पदार्थ शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात.
रोजच्या आहारात काहींना सतत पाव किंवा मैद्यापासून बनवलेले पदार्थ खाण्याची सवय असते. पण वारंवार मैद्यापासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढण्यास सुरुवात होते.