भारतीय पदार्थ फार वैविध्यपूर्ण आहेत. आजही अनेक देशात भारताला त्याच्या खाद्यपदार्थांमुळे ओळखले जाते. भारतीय खाद्यपदार्थ जगप्रसिद्ध आहेत. मात्र असे अनेक भारतीय पदार्थ आहेत जे आपण आवडीने खातो पण ते मूळ भारतचे नसून इतर देशातून आलेले आहेत. कोणते आहेत ते पदार्थ? जाणून घेऊयात.
सामोसा - आवडीने खाल्ला जाणारा सामोसा हा पदार्थ मूळचा भारताचा नसून तो 13 व्या,14 व्या शतकात मध्य पूर्वेच्या व्यापारांकडून भारतात आला. मुख्य म्हणजे अनेक शतकांनंतरही सामोसा भारतीयांच्या आवडीचा पदार्थ बनला.
गुलाबजाम - नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटणारा गुलाबजाम हा पर्शियांद्वारे भारतात आला. अनेक लग्नसोहळ्यात किंवा आनंदाच्या प्रसंगी आजही भारतात गुलाबजाम आणून याचा आस्वाद घेतला जातो .
राजमा - अनेक स्वयंपाक घरात वापरला जाणारा राजमा हा पदार्थ मेक्सिकोतून भारतात आला. आजही मिक्सीकन पाककृतींमध्ये राजमा वापरला जातो.
जिलेबी - भारताची लोकप्रिय मिठाई जिलेबी मध्य पूर्वेतून भारतात आली. पर्शियन आक्रमकांनी जिलेबी भारतात आणली.
चहा - भारतात चहाप्रेमी अनेक आहेत. हा चहादेखील भारताचा पेय नसून चीनचे पेय आहे. चहा हा चीनचा शोध असल्याचे म्हटले जाते.
नान - भारतीय खाद्यपदार्थांतील लोकप्रिय पदार्थ नान हा मुघलांकडून भारताला मिळाला. भारतात नानचे अनेक वेगवेगळे पदार्थ पाहायला मिळतात.