दैनंदिन आहारात कायमच पालेभाज्या आणि फळभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्यांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.दुधी भोपळ्याची भाजी अनेक लोक आवडीने खातात. यामध्ये फायबर आणि भरपूर पाणी असते. शरीरात डिहायड्रेशनची समस्या निर्माण झाल्यानंतर दुधी भोपळा खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे शरीर हायड्रेट राहते. पण दुधी भोपळा खाल्यामुळे आरोग्याला जितके फायदे होतात तितकेच तोटे सुद्धा होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात दुधी भोपळ्याचे अजिबात सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. दुधी भोपळ्याचे सेवन केल्यास आतड्यांसंबंधित आजार वाढू लागतात. (फोटो सौजन्य – istock)
या' लोकांनी आहारात अजिबात करू नका दुधी भोपळ्याचे सेवन
कमी रक्तदाबाची समस्या असणाऱ्या लोकांनी आहारात दुधी भोपळ्याचे अजिबात सेवन करू नये. यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे रक्तदाब आणखीनच कमी होतो आणि आरोग्य बिघडते. दुधी भोपळ्याचे अतिप्रमाणात सेवन केल्यास चक्कर, अशक्तपणा किंवा बेशुद्ध होण्याची जास्त शक्यता असते.
पचनाच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात अजिबात दुधी भोपळ्याचे सेवन करू नये. यामुळे अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता वाढते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया मंदावते.
दुधी भोपळा किडनीच्या रुग्णांसाठी अतिशय घातक ठरू शकतो. यामध्ये पोटॅशियम जास्त प्रमाणात असते. शरीरात पोटॅशियमची पातळी वाढल्याने किडनीवर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे किडनीसंबंधित समस्या उद्भवतात.
गरोदरपणात आरोग्याची खूप जास्त काळजी घेतली जाते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेऊनच दुधी भोपळ्याचे सेवन करावे. यामध्ये असलेले विषारी घटक बाळाच्या गर्भाशयात प्रवेश करतात.
दुधी भोपळा खरेदी करताना योग्य खबरदारी घ्यावी. चुकीची भाजी आणल्यास त्यामध्ये असलेले 'कुकरबिटासिन' नावाचे विषारी संयुग शरीरात प्रवेश करते, ज्यामुळे उलट्या, जुलाब आणि विषबाधा होण्याची जास्त शक्यता असते.