शरीरातील सगळ्यात महत्वाचा अवयव म्हणजे किडनी. किडनी शरीरातील रक्त शुद्ध करण्याचे आणि विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्याचे काम करते. रक्तात साचून राहिलेले विषारी घटक किडनी बाहेर काढते. मात्र दैनंदिन आयुष्यातील चुकीच्या सवयी किडनीच्या कार्यासाठी अतिशय घातक ठरतात. आहारात चुकीच्या पदार्थांचे सेवन केल्यासमुळे किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय पेनकिलरच्या गोळ्या किडनीच्या कार्यावर गंभीर परिणाम करतात. त्यामुळे रोजच्या आहारात या पदार्थांचे अजिबात सेवन करू नये. या चविष्ट पदार्थांच्या सेवनामुळे किडनी निकामी होण्याची शक्यता असते. (फोटो सौजन्य – iStock)
किडनी निकामी होण्यास कारणीभूत ठरतात 'हे' चविष्ट पदार्थ, आहारात अजिबात करू नका सेवन
बाजारात उपलब्ध असलेल्या हानिकारक कोल्ड्रींकच्या सेवनामुळे किडनीला त्रास होण्याची जास्त शक्यता असते. उन्हाळ्यात सतत कोल्ड्रींक पिणे किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरेल.
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ सगळेच खूप आवडीने खातात. मात्र या अन्नपदार्थांच्या सेवनामुळे पचनक्रिया बिघडण्यासोबतच किडनीच्या कार्यात अडथळे निर्माण होतात. सॉसेज, सलामी, हॉट डॉग इत्यादी पदार्थांचे आहारात सेवन करू नये.
पनीर, चीज इत्यादी दुधापासून बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खायला खूप आवडतात. मात्र या पदार्थांमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. या पदार्थांचे अतिसेवन केल्यामुळे किडनी कमकुवत होऊ शकते.
विटामिन सी युक्त संत्र्याचा किंवा इतर फळांचा रस सगळेच आवडीने पितात. मात्र यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. शरीरात वाढलेली पोटॅशियमची पातळी किडनीसाठी धोकादायक ठरू शकते.
आंबटगोड चवीचे लोणचं सगळेच लोक आवडीने खातात. पण लोणचं खाणे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. यामध्ये शरीरात द्रवपदार्थ साठून राहतात आणि पोटॅशियमची पातळी वाढते.