लग्नसराईच्या दिवसांना सुरुवात झाली आहे. लग्नात महिला मराठमोळ्या पारंपरिक साड्या नेसण्यास खूप जास्त पसंती दर्शवतात. मराठमोळ्या साड्या सणावारांची आणि कार्यक्रमाची शोभा वाढवतात. भरजरी साड्यांची खरेदी घरातील शुभ कार्यांमध्ये केली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील काही मराठमोळ्या साड्यांबद्दल सांगणार आहोत. या साड्या प्रत्येक महिलेच्या कपाटात असायलाच हव्यात. मराठमोळ्या हातमागावर विणलेल्या साड्या अंगावर अतिशय चापून चोपून बसतात. याशिवाय साड्यांचा लुक अतिशय सुंदर दिसतो. (फोटो सौजन्य – pinterest)
या' मराठमोळ्या साड्या आहेत महाराष्ट्राची छान

लग्न समारंभ किंवा घरातील कोणत्याही कार्यक्रमांमध्ये महिला कांजीवरम, बनारसी, गढवाल सिल्क, नल्ली सिल्क, धर्मावरम, संबळपुरी साड्या नेसून मिरवतात. या साड्या वजनाने अतिशय हलक्या असून पारंपरिक आणि मराठमोळा लुक देतात.

महाराष्ट्राचे महावस्त्र म्हणून ओळखली जाणारी पैठणी साडी जगभरात प्रसिद्ध आहेत. लोटस पैठणी, मुनिया पैठणी, सेमी पैठणी, सॉफ्ट सिल्क इत्यादी अनेक प्रकारांमध्ये पैठणी साडी उपलब्ध आहे.

महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगरची ओळख असलेली प्रसिद्ध साडी म्हणजे हिमरू साडी. मोहम्मद बिन तुघलक यांच्या राजवटीत हिमरू कलेला सुरुवात झाली होती. त्यानंतर रेशीम आणि कापूस यांच्या धाग्यातून हिमरूची निर्मिती करून सुंदर साडी तयार करण्यात आली होती. हिमरू साडीवर गुंतागुंतीचे विणकाम केले जाते.

बाजारात हातमागावर विणण्यात आलेल्या इरकल साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कर्नाटकच्या इलकल शहराची ओळख असलेली साडी महाराष्ट्रात विणण्यात आली होती. या साडीची किंमत ७ हजारांपेक्षा जास्त आहे. तसेच बाजारात सेमी इरकल साड्यासुद्धा उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील पारंपरिक साडी म्हणून खण साडीची ओळख आहे. ८ व्या शतकात खण साडीची निमिर्ती करण्यात आली होती. खण साडीचा मुख्य भागही दोन रंगाच्या धाग्यांमध्ये विणला जातो. तसेच अस्सल खणाची साडी बनवण्यासाठी १५ दिवसांचा वेळ लागतो.

लग्नसराईत नारायण पेठ साडीला खूप जास्त मागणी आहे. ही साडी अतिशय तलम आणि वजनाला हलकी असते. साडीचा मोठा काठ आणि बारीक बुट्या नारायण पेठ साडीचे विशेष आकर्षक ठरतात.






