पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात अनेक वेगवेगळ्या पालेभाज्या आणि रान भाज्या उपलब्ध होतात. कोकणात निर्सगाच्या सानिध्यात उगणाऱ्या भाज्यांचे मोठ्या प्रमाणावर सेवन केले जाते. या भाज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. भाज्यांच्या सेवनामुळे शरीर निरोगी राहते. पावसाळ्यात भाज्यांना व्यवस्थित पाणी मिळाल्यामुळे भाज्या उपलब्ध होतात.आज आम्ही तुम्हाला पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोणत्या पालेभाज्या आणि रानभाज्यांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या रानभाज्या पावसाळ्यात बाजारामध्ये उपलब्ध असतात. (फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात उपलब्ध असतात 'या' रानभाज्या
कोकणात अतिशय आवडीने खाल्ली जाणारी भाजी म्हणजे अळूची भाजी. अळूच्या पानांपासून बनवलेली आंबटगोड भाजी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. या भाजीमध्ये जीवनसत्त्व इ, मॅग्नेशियम आणि इतर पोषक घटक आढळून येतात.
पावसाळ्यात अंबाड्याची भाजी सगळीकडे उपलब्ध असते. यामध्ये लोह, झिंक आणि इतर पोषक घटक आढळून येतात. शरीरात वाढलेला अशक्तपणा कमी करण्यासाठी अंबाड्याच्या भाजीचे सेवन करावे.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी टाकळ्याची भाजी खावी. ही भाजीला चवीला अतिशय सुंदर लागते. हिरव्यागार पानांची रानभाजी पावसाळ्यात उपलब्ध असते.
पावसाळ्यात भंगरंगीची भाजी खावी. वर्षातून एकदा मिळणाऱ्या भाज्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी असतात. या भाज्या खाल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळतात.
कोकणातील हिरव्यागार निसर्गात कंटोळीची वेली असतात. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली कंटोळीची भाजी पावसाळ्यात बाजारात उपलब्ध असते.