यंदाच्या वर्षी 11 मे ला मदर्स डे साजरा केला जाणार आहे. यादिवशी आईवर असलेले निस्वार्थ प्रेम, आदर, आपुलकीसह आईबद्दल असलेल्या प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. मदर्स डे च्या सर्वच मुलं आपल्या आईला सुंदर सुंदर भेटवस्तू देतात. संपूर्ण कुटुंबाच्या पालनपोषणची जबाबदारी आईकडे असते. मात्र कधीही न थकता आई सतत आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यसाठी सतत काहींना काही करत असते. मदर्स डे च्या दिवशी आईला नेमकी काय भेटवस्तू द्यावी? असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील पडले असतील. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला आईला देण्यासाठी काही सुंदर भेटवस्तू सांगणार आहोत. या भेटवस्तू आईच्या कायम आठवणींमध्ये राहतील. (फोटो सौजन्य – pinterest)
मदर्स डे ला आईला द्या सुंदर भेटवस्तू
मदर्स डे च्या दिवशी आईला तुम्ही बनारसी, कांजीवरम, पैठणी किंवा इतर डिझायनर साडी भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुम्ही दिलेली साडी आईला नक्कीच खूप जास्त आवडेल.
सर्वच महिलांना दागिने खूप जास्त आवडतात. त्यामुळे आईला तुम्ही अंगठी, लक्ष्मी हार, कानातले किंवा नाजूक साजूक सुंदर दागिने भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुम्ही दिलेले दागिने पाहून आई खूप जास्त खुश होईल.
बाजारात अनेक कस्टमाइज्ड हॅम्पर उपलब्ध आहेत. त्यामध्ये तुम्ही कोणतेही सुंदर स्किनकेअर प्रॉडक्ट, हेअर केअर प्रॉडक्ट किंवा इतर कोणतेही चॉकलेट गिफ्ट हॅम्पर भेटवस्तू म्हणून देऊ शकता.
आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही आईला तेल, बॉडी लोशन, फेस मास्कस, आरामदायी स्पा हॅम्पर्स किंवा फेशिअल किट भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुम्ही दिलेल्या भेट्वस्तूचा आईला नक्कीच उपयोग होईल.
प्रत्येक महिला हॅन्ड बँग्स किंवा इतर स्टयलिश बँग्स खूप आवडतात. आईला तुम्ही सुंदरशी हॅन्ड बॅग मदर्स डे ला भेटवस्तू म्हणून देऊ शकता.