धक्कादायक! अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत; बेपत्ता झाल्याच्या ६ दिवसानंतर सापडला मृतदेह (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Crime News: अमेरिकेत भारतीय सुरक्षित नाहीत? USA मध्ये विद्यार्थ्यावर गोळीबार अन्…; नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, साकेत हा मूळचा कर्नाटकच्या तुनकुरू जिल्ह्याचा रहिवासी होता. तो ९ फेब्रुवारीपासून बेपत्ता होता. त्याच दिवशी त्याच्या वडिलांचे शेवटचे बोलणे झाले होते. त्यानंतर कुटुंबाचा साकेतशी कोणताही संपर्क झाला नाही. यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी त्याच्या मित्रांकडे चौकशी केली. पण कोणत्याही प्रकारची माहिती न मिळल्याने बर्कले पोलिस विभागात तक्रार दाखल करण्यात आली.
तक्रार दाखल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने साकेतचा शोध घेण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान रविवारी(१५ फेब्रुवारी) कॅलिफोर्नियाच्या टिल्डन नॅशनल पार्कजवळ साकेतला पाहिले गेल्याचे पोलिसांना समजले. यानंतर पोलिसांनी पार्कमध्ये शोध घेतला तेव्हा त्यांना परिसरात एक बॅकपॅक आणि त्याचे वैयक्तिक साहित्य सापडले होते. यानंतर याचा आणखी शोध घेण्यात आल्यानंतर साकेत मृत अवस्थेत आढळला. साकेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे प्रोडेक्ट डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याचे उच्च शिक्षणाचे स्वप्न अपुरेच राहिले.
या घटनेची माहिती देताना सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. तसेच दूतावास साकेतच्या प्रकरणासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. याशिवाय दूतावासाने साकेतच निधनाबद्दल कुटुंबीयाप्रती तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. सध्या त्याचे पार्थिव भारतात आणण्यासाठी कुटुंबाला सर्व कायदेशीर मदत पुरवली जात असल्याचे दूतावासाने म्हटले आहे. परंतु या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्या पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Consulate General of India in San Francisco is deeply concerned about the disappearance of Saketh Sreenivasaiah, an Indian post-graduate student of UC Berkeley, hailing from the State of Karnataka. The Consulate is in touch with the family and also is in contact with the… — India in San Francisco (@CGISFO) February 14, 2026
शिकागोमध्ये दहशत: भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या; वाणिज्य दूतावासाकडून कारवाईची मागणी
Ans: २२ वर्षीय साकेत श्रीनिवासैया हा कर्नाटक राज्यातील तुमकुरु जिल्ह्ल्याचा रहिवासी होता,
Ans: साकेत युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे प्रोडेक्ट डेव्हलपमेंटमध्ये पदव्युत्तर शिक्षण अमेरिकेत गेला होता.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, साकेत ९ फेब्रुवारी २०२६ रोजी बेपत्ता झाला होता. याच्या ६ दिवसांनतर रविवारी (१५ फेब्रुवारी) त्याचा मृतदेह सापडला आहे.






