टेलिव्हिजनवरचा चर्चित असलेला बिग बॉस १८ ची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्याचबरोबर या घरामध्ये राहणाऱ्या सदस्यांच्या लोकप्रियतेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आता टॉप १० टीव्ही कलाकारांची यादी जाहीर झाली आहे. २०२४ च्या ४९ आठवड्यांच्या या यादीत 'बिग बॉस १८' च्या दोन सदस्यांनी टॉप-२ मध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
बिग बॉसचे हे स्पर्धक टॉप १० कलाकारांच्या यादीत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
मागील आठवड्यामध्ये विकेंडच्या वॉरमध्ये करणवीर मेहराचे भरभरून कौतुक केले. त्याला सांगितले की तू सध्या शोमध्ये कमाल करताना दिसत आहेत. कलाकारांच्या टॉप १० यादीमध्ये 'बिग बॉस 18' चा करणवीर मेहरा अव्वल स्थानावर आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रसिद्ध अभिनेता आणि 'बिग बॉस 18' च्या विवियन डिसेनाने गेल्या आठवड्यात पहिले स्थान मिळवले होते. या आठवड्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रसिद्ध टीव्ही सीरियल 'अनुपमा' फेम रुपाली गांगुली टॉप 10 च्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिला मागील काही वर्षांपासून प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
एकीकडे 'ये रिश्ता क्या कहलाता है'चा रोहित पुरोहित या यादीत 10 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे समृद्धी शुक्लाचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रणाली राठौर तिच्या 'दुर्गा' या मालिकेमुळे चर्चेत आहे. या आठवड्यात त्याने टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे, तो पाचव्या क्रमांकावर आहे. याआधी तिने ये रिश्ता क्या कहलाता है मध्ये केलेल्या भूमिकेसाठी सुद्धा प्रेक्षकांनी भरपूर दिले होते. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टेलिव्हिजनवरची प्रसिद्ध अभिनेत्री आणि 'बिग बॉस 18' स्पर्धक ईशा सिंगचे नाव टॉप 10 टीव्ही कलाकारांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. मागील काही आठवड्यापासून तिला बिग बॉसच्या घरामध्ये पसंती मिळत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
बिग बॉस 18 च्या घरचा नुकताच झालेला नवा टाइम गॉड अविनाश मिश्राला सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रेम मिळत आहे. 'बिग बॉस 18' च्या अविनाश मिश्राने टॉप 10 च्या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भाविका शर्माचे नाव आठव्या क्रमांकावर आहे. भाविका तिच्या 'गम है किसी के प्यार में' शो आणि 'बिग बॉस 18' च्या अविनाश मिश्रामुळे चर्चेत आहे. खरंतर ती अविनाशची कथित गर्लफ्रेंड असल्याचं बोललं जात आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री शिवांगी जोशीने तिच्या 'हार्टबीट्स' या वेबसीरिजमुळे या यादीत नवव्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. टेलिव्हिजनवरची ती प्रसिद्ध अभिनेत्री आणि चाहत्यांची आवडती देखील आहे.
'ये रिश्ता क्या कहलाता है' मध्ये अरमान पौद्दारची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित पुरोहित या आठवड्यात टॉप 10 मध्ये आला आहे. त्याचे नाव दहाव्या क्रमांकावर आहे.