दैनंदिन आहारात नेहमीच फायबरयुक्त अन्नपदार्थांचे सेवन करावे. फायबर असलेल्या अन्नपदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. त्यामुळे रोजच्या आहारात फायबरयुक्त अन्नपदार्थांचे मोठ्या प्रमाणावर सेवन करावे. पचनक्रिया सुधारण्यासाठी फायबर अतिशय आवश्यक आहे. शरीरात फायबरची कमतरता निर्माण झाल्यानंतर बद्धकोष्टाता, अपचन, गॅस इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला शरीरातील फायबर वाढवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
रोजच्या रोज पोट स्वच्छ करण्यासाठी आहारात करा 'या' फायबरयुक्त पदार्थांचे नियमित सेवन
घरात गोड पदार्थ बनवताना त्यात काजू, बदाम आणि ड्रायफ्रूट टाकले जातात. यामध्ये भरपूर पोषक घटक आढळून येतात. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर भिजवलेले काजू बदाम खावे.
फळांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. रोजच्या आहारात पेरू, चिकू, केळी इत्यादी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया निरोगी राहील.
लहान मुलांसपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच कबुली चणे आवडीने खातात. काबुली चण्याचे सेवन केल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीर स्वच्छ राहते.
हिरव्या मटारमध्ये भरपूर फायबर आढळून येते. रोजच्या आहारात हिरवे मटार किंवा वाटणे खाल्यास शरीरात कधीच फायबरची कमतरता निर्माण होणार नाही.
शिवलेले रताळे चवीला अतिशय सुंदर लागतात. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर आढळून येते. रताळ्यांसोबतच आहारात नियमित गाजर आणि इतर सॅलड युक्त भाज्यांचे सेवन करावे.