मागील काही काळापासून अनेकांना युरिक अॅसिडची समस्या फार सतावत आहे. हे समस्या वेळीच नियंत्रणात केली नाही तर यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे गाउट, मूत्रपिंडात खडे आणि सांध्यांमध्ये वेदना, सूज यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशात यावर वेळीच नियंत्रण मिळवणे फार गरजेचे आहे. यासाठी तुम्ही तुमच्या आहारात काही सुपरफुड्सचा समावेश करू शकता.
युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवायचे असेल तर आजपासून करा या सुपरफुड्सचे सेवन
युरिक अॅसिडची समस्या सध्या अनेकांना भेडसावत असून वेळीच यावर योग्य त्या उपाययोजना न केल्यास आरोग्याच्या समस्यांना खुले आमंत्रण मिळू शकते. यासाठी फार काही करण्याची गरज नाही तर फक्त आहारात काही सुपरफुड्सचा समावेश करा
ज्या लोकांना जास्त युरिक आहारात त्रास आहे त्यांनी आपल्या आहारात ब्रोकलीचे सेवन करावे. ब्रोकोलीमध्ये प्युरिनचे प्रमाण कमी असते. यात अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे संधिवातापासून आराम मिळवता येतो.
युरिक अॅसिडची पातळी कमी करण्यासाठी जवसाच्या बियांचे सेवन फायदेशीर मानले जाते. जवसाच्या बियांना भिजवून त्याचे सेवन केले जाऊ शकते. तथापि चांगले परिणाम मिळवण्यासाठी याचे मर्यादित प्रमाणातच सेवन करावे
युरिक अॅसिडच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन सी समृद्ध फळांचा आहारात समावेश करू शकता, यामुळे संधिवाताची समस्या दूर होते. यासाठी संत्री, गोड लिंबू, लिंबू आणि आवळा अशा फळांचा आहारात समावेश करू शकता.
यासहच रोजच्या आहारातील आले देखील शरीरातील युरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. सांधेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी हा एक प्रभावी उपाय आहे.