जेवणातील सर्वच पदार्थ बनवताना टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले आहे. कारण यामध्ये असलेले विटामिन सी आणि इतर आवश्यक घटक शरीर कायमच निरोगी ठेवण्यासाठी मदत करतात.यामध्ये विटामिन-सी, पोटॅशियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी आवश्यक घटक आढळून येतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी टोमॅटोचा वापर केला जातो. मात्र काहींच्या आरोग्यासाठी टोमॅटो खाणे अतिशय धोक्याचे ठरू शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोणत्या लोकांनी आहारात टोमॅटोचे सेवन करू नये, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. त्यामुळे टोमॅटोचे सेवन करणे पूर्णपणे टाळावे. (फोटो सौजन्य – istock)
'या' लोकांच्या आरोग्यासाठी टोमॅटो ठरेल विषसमान!
दैनंदिन आहारात कमीत कमी प्रमाणात टोमॅटोचे सेवन करावे. यामुळे आरोग्यासंबंधित कोणत्याही गंभीर समस्या उद्भवणार नाहीत. टोमॅटो खाणे आरोग्यासाठी जितके चांगले आहे तितकेच वाईट सुद्धा आहे.
टोमध्ये सायट्रिक अॅसिड आणि मॅलिक अॅसिड आढळून येते. यामुळे पोटात आम्ल्पित्त वाढण्याची जास्त शक्यता असते. आम्ल्पित्त वाढल्यानंतर छातीमध्ये जळजळ होणे, वेदना होणे किंवा मळमळ वाटू लागते. त्यामुळे ऍसिडिटीच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी टोमॅटो खाऊ नये.
टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन तयार होतात. ऑक्सलेट आणि कॅल्शियम एकत्र मिक्स झाल्यामुळे किडनीमध्ये खड्डे होतात. त्यामुळे किडनी स्टोनच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात टोमॅटोच्या आतील बिया काढून टोमॅटो खावा.
टोमॅटोमध्ये असलेले सोलानाइन कंपाऊंड सांध्यांमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करते. तसेच टोमॅटो खाल्यामुळे सांधेदुखी आणि कडकपणा वाढून खाली बसताना किंवा वर उठताना वेदना होतात.
टोमॅटोचे सेवन केल्यामुळे काहींना ऍलर्जी येते. तोंडात खाज सुटणे, पुरळ येणे, सूज येणे किंवा मुंग्या येणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. तसेच संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांनी टोमॅटो खाऊ नये.