सर्वच स्त्रिया सौंदर्यात भर पाडण्यासाठी मराठमोळ्या दागिन्यांसह पूर्वीच्या काळातील दागिने परिधान करतात. दागिने घातल्यानंतर साडीवरील लुक खुलून दिसतो. महिलांना कायमच वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घालायला खूप जास्त आवडतात. त्यातील आजीच्या आठवणीतील दागिना म्हणजे चिडामोती चोकर. चिडामोती चोकर पिढ्यांपिढ्यांपासून वापरला जाणारा आकर्षक आणि कोणत्याही लुकवर खुलून दिसणारा दागिना आहे. लहान, नाजूक आणि चमकणाऱ्या चिडामोत्यांची गुंफण करून चोकर तयार केली जाते. चला तर पाहुयात चिडामोती चोकरच्या काही आकर्षक डिझाईन. (फोटो सौजन्य – pinterest)
पारंपरिक दागिन्यांचा पुन्हा एकदा ट्रेंड! 'हे' चिडामोती चोकर डिझाईन्स सौंदर्यात पडतील भर

भरजरी साडी किंवा ड्रेस परिधान केल्यानतंर त्यावर तुम्ही चिडामोती चोकर परिधान करू शकता. हल्लीच्या मॉर्डन युगात सुद्धा पारंपरिक दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे.

नाजूक मोत्यांना चिडामोती असे म्हंटले जाते. हे मोती अतिशय उठावदार दिसतात. चिडामोती चोकर बनवताना वेगवेगळ्या पाचू आणि हिऱ्यांच्या रत्नांचा सुद्धा वापर केला जातो.

पारंपरिक दागिन्यांमध्ये चिडामोती चोकरला खूप जास्त महत्व आहे. मोत्यांची नाजूक चमक आणि चोकरची घट्ट बसणारी रचना यामुळे चोकर अतिशय सुंदर दिसतो. आउटफिटला रॉयल लूक देण्यासाठी चिडामोती चोकर परिधान करावा.

लग्नसमारंभ, हळदी, रिसेप्शन किंवा खास सणावारासाठी तुम्ही चिडामोती चोकरची निवड करू शकता. बारीक बारीक रंगीत मोती आणि चिड्यांची कलात्मक रचना करून तयार केलेला रॉयल चोकर कोणत्याही साडीवर शोभून दिसेल.

हल्ली सगळ्यांचं मोत्याचे दागिने घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे चार पदरी चोकरच्या मध्यभागी सोन्याचे किंवा कोरीव काम केलेले पेंडंट लावू शकता.






