तुळशीच्या पानांचा वापर धार्मिक गोष्टींसाठी केला जातो. याबरोबरच त्वचा आणि आरोग्यासंबंधित समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर केला जातो. नियमित एक तुळशीचे पान चावून खाल्यास आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होतात. या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट, दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म आढळून येतात. पोषक तत्वांनी समृद्ध असलेली तुळशीची पाने त्वचेवरील पिंपल्स, काळे डाग घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आज आम्ही तुम्हाला तुळशीच्या पानांचा त्वचेला नेमका काय फायदा होतो? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
त्वचेसाठी वरदान ठरतील तुळशीची पाने

तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म त्वचेवर आलेले मुरूम आणि पिंपल्स कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. तसेच या पानांचा वापर त्वचेसाठी केल्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि चेहरा उजळदार दिसू लागतो.

तुळशीच्या पानांमधील अँटीसेप्टिक गुणधर्म किरकोळ जखमा, संसर्ग बरा करण्यासाठी फायदेशीर ठरतात. त्वचेवरील इन्फेक्शनचा धोका कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करावा.

दैनंदिन आहारात दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी तुळशीच्या पानांचा चहा प्यावा. यामुळे त्वचा, आरोग्य सुधारण्यास मदत होईल. शरीरातील हानिकारक घटक बाहेर पडून जातील.

तुळशीच्या पानांमध्ये असलेले अँटीआक्सीडेंट गुणधर्म त्वचेवरील डाग घालवण्यासाठी मदत करतात. अकाली वृद्धत्व, सुरकुत्या आणि बारीक रेषांपासून त्वचेचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करावा.

त्वचेवर आलेले ब्लॅकहेड्स आणि व्हाइटहेड्स कमी करण्यासाठी तुळशीच्या पानांचा लेप तयार करून त्वचेवर लावावा. याशिवाय त्वचा आतून स्वच्छ करण्यासाठी तुळशीची पाने अतिशय प्रभावी आहेत.






