आज आम्ही तुम्हाला भारतातील अशा एका घराविषयी माहिती सांगणार आहोत, जे दोन राज्यांमध्ये विभागले गेले आहे. हे घर नेहमीच चर्चेत असते. या घराची अनोखी रचना नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करते. याचा एक दरवाजा राजस्थानमध्ये आहे आणि दुसरा हरियाणामध्ये आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
देशातील अनोखे घर जे वाटले गेले आहे दोन राज्यात; एक दरवाजा हरियाणात तर दुसरा दरवाजा राजस्थानात!
आम्ही तुम्हाला सांगतो की, या घराच्या खोल्या हरियाणात उघडतात तर घराचे आंगण आणि बाथरूम राजस्थानमध्ये आहे. हे घर अशा प्रकारे बांधले गेले आहे की त्याचा एक भाग हरियाणामध्ये आहे तर दुसरा भाग राजस्थानमध्ये आहे
माहितीनुसार, या घरात दोन भाऊ त्यांच्या कुटुंबासह राहतात. या दोन्ही भावांची नावे ईश्वर सिंह आणि कृष्ण कुमार अशी आहेत
ईश्वर सिंह यांचे कुटुंब राजस्थानच्या सरकारी योजनांचा लाभ घेते. तर, त्यांचा भाऊ कृष्ण कुमार यांचे कुटुंब हरियाणाच्या सुविधांचा लाभ घेते
ईश्वर सिंह यांचा मुलगा हवा सिंह दयामा भिवाडी नगरपरिषदेतून सलग तिसऱ्यांदा नगरसेवक झाला आहे. तर कृष्ण कुमार धारुहेडा नगरपालिकेत दोनदा नगरसेवक झाला आहे
या कुटुंबातील लोक दोन्ही राज्यांचा भाग बनून एक वेगळे जीवन जगत आहेत. वर्षानुवर्षांपासून हे कुटुंब दोन्ही राज्यांच्या सीमेवरच राहत आहेत