Vadh Movie Trailer Released Neena Gupta And Sanajy Mishra Seen In Different Role Nrsr
संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या ‘वध’ चित्रपटाचा ट्रेलर पाहून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
संजय मिश्रा (Sanjay Mishra) आणि नीना गुप्ता (Neena Gupta) अभिनित ‘वध’ (Vadh)या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला असतानाच ‘वध’या चित्रपटाचा ट्रेलर (Vadh Trailer) प्रदर्शित झाला आहे. प्रेक्षकांनी संजय मिश्रा यांना त्यांच्या कारकिर्दीत विविध भूमिका साकारताना पाहिलं आहे, पण आता ‘वध’ या चित्रपटामार्फत संजय मिश्रा एका अनोख्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत. संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांच्या व्यक्तिरेखेत खूप निरागसता दिसत असली तरीसुद्धा त्यांची डार्कसाइड ट्रेलरचा एक महत्वपूर्ण भाग आहे. ‘वध’ हा चित्रपट राजीव बर्नवाल आणि जसपाल सिंग संधूद्वारा लिखित आणि दिग्दर्शित असून, जे स्टुडिओ आणि नेक्स्ट लेव्हल प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे. तसेच, लव फिल्म्सचे लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती केली आहे. हा चित्रपट ९ डिसेंबर २०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.