विटामिन सी युक्त फळांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळांमध्ये असलेल्या गुणधर्मांचा त्वचा, केस आणि आरोग्यावर सकरात्मक परिणाम दिसून येतो. त्यामुळे दैनंदिन आहारात नियमित विटामिन सी युक्त फळांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी असते, असे सगळ्यांचं वाटत. पण संत्र्यापेक्षा जास्त विटामिन सी इतर फळांमध्ये सुद्धा आढळून येते. आज आम्ही तुम्हाला कोणत्या फळांमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन सी आढळून येते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – istock)
'या' फळांमध्ये भरपूर प्रमाणात आढळून येते विटामिन सी
नैसर्गिक गोड चवीचे अननस खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. अननसाच्या एका कापमध्ये सुमारे ७९ मिलीग्राम विटामिन सी आढळून येते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. अननस खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि शरीरात वाढलेली जळजळ कमी होते.
शरीराची बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी पपई खावा. पपई खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. नियमित सकाळी उठल्यानंतर पपई खाल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो.
किवी खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी मानले जाते. यामध्ये ६४ मिलीग्राम विटामिन सी आढळून येते. किवीचे सेवन केल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते आणि झोपेची गुणवत्ता सुधारसण्यास मदत होते.
लाल चुटुक स्ट्रोबरी चवीला अतिशय गोड लागते. स्ट्रॉबेरीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात. दिसायलाच सुंदर नसून आरोग्यासाठी वरदान आहेत. एका कप स्ट्रॉबेरीमध्ये अंदाजे ८५ मिलीग्राम विटामिन सी आढळून येते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात लिची उपलब्ध असतात. लिचीची सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. या फळामध्ये भरपूर पाणी असते, ज्यामुळे शरीर हायड्रेट राहते.