सध्याच्या फॅशन युगात अनेक नवनवीन डिझाईनचे दागिने सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.सर्वच महिलांना दागिने परिधान करायला खूप जास्त आवडतात. वेगवेगळ्या डिझाईनचे दागिने घातल्यानंतर लुक अतिशय स्टायलिश आणि मॉर्डन दिसतो. सध्या सगळीकडे व्हिक्टोरिया मंगळसूत्रची मोठी क्रेझ आहे. डायमंडच्या दागिन्यांना मॉर्डन टच देऊन बनवलेले सुंदर दागिने कोणत्याही लुकवर शोभून दिसतात. लग्न झालेली प्रत्येक स्त्री गळ्यात मंगळसूत्र घालते. त्यामुळे डिझाइनर किंवा हेवी लुकवरील साडीवर व्हिक्टोरिया मंगळसूत्र घालू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
डिझायनर साडीवर घाला स्टायलिश पॅटर्नचे व्हिक्टोरिया मंगळसूत्र

व्हिक्टोरिया मंगळसूत्र डायमंड आणि वेगवेगळ्या रंगीत मण्यांचा वापर करून बनवले जाते. काळ्या मण्यांच्या मंगळसूत्रातील मोठे पेंडेंट अतिशय स्टायलिश लुक देईल.

दागिन्यांना गोल्ड प्लेटिंग, रोज गोल्ड किंवा ऑक्सिडाईज्ड फिनिश दिली जाते. त्यामुळे व्हिंटेज लुक येतो. बनारसी किंवा कांजीवरम साडीवर तुम्ही या डिझाईनचे मंगळसूत्र घालू शकता.

वाटी मंगळसूत्र घालायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे व्हिक्टोरिया मंगळसूत्रामध्ये सुद्धा वाटी डिझाईन मंगळसूत्र उपलब्ध आहेत. यासोबतच मंगळसूत्राला मॅच होतील असे कानातले घालावे.

काहींना अतिशय मिनिमल लुक हवा असतो. गळ्यात जास्त दागिने नको असल्यास या डिझाईनचे सुंदर मंगळसूत्र परिधान करू शकता. यामध्ये तुमचा लुक मॉर्डन दिसेल.

तरूण पिढीमध्ये शॉर्ट आणि मिडियम लांबीच्या व्हिक्टोरिया मंगळसुत्रांना खूप जास्त मागणी आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्व सामान्यांपर्यंत प्रत्येक महिलेच्या गळ्यात तुम्हाला व्हिक्टोरिया मंगळसूत्र पाहायला मिळेल.






