लग्न किंवा इतर कार्यक्रमांच्या निमित्ताने महिला साड्यांची खरेदी करतात. कांजीवरम, सिल्क, पैठणी, कॉटन किंवा बनारसी साडी विकत घेतली जाते. बनारसी साडी सर्वच महिलांना नेसायला खूप आवडते. कारण ही साडी नेसल्यानंतर अतिशय सुंदर आणि उठावदार लुक दिसतो. या साडीचे रंग गडद असल्यामुळे कोणत्याही त्वचेच्या रंगावर बनारसी साडी सुंदरच दिसते. पण काहीवेळा साडी खरेदी करायाला गेल्यानंतर नेमक्या कोणत्या रंगाची बनारसी साडी विकत घ्यावी, असे अनेक प्रश्न महिलांच्या मनात निर्माण होतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बनारसी साडीच्या काही ट्रेंडिंग रंगांबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य –pinterest)
बनारसी साडीचा न्यारा थाट!
जांभळ्या रंगाची साडी कोणत्याही रंगावर अतिशय सुंदर दिसते. बाजारात जांभळ्या रंगाला भरपूर मागणी आहे. जांभळ्या रंगाच्या बनारसी साडीवर खड्याचे किंवा मोत्याचे दागिने सुंदर दिसतील.
लाल रंगाची बनारसी साडी सर्वच महिला आवडीने नेसता बाजारात लाल रंगाच्या बनारसी साडीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. लाल रंगाची साडी अतिशय हेवी लुक देते.
मरुन रंगाची बनारसी साडी लग्नाच्या रिसेप्शनमध्ये मोठ्या प्रमाणात नेसली जाते. कारण हा रंग उठावदार आणि अतिशय रॉयल लुक दिसतो. त्यामुळे तुम्ही सुद्धा मरून रंगाची बनारसी साडी खरेदी करू शकता.
गुलाबी रंगाची साडी सगळ्यांचं खूप आवडते. गुलाबी रंगाची बनारसी साडी तुम्ही लग्नकार्यात किंवा घरातील कार्यक्रमांमध्ये नेसू शकता. या रंगाच्या साडीमध्ये तुमचा लुक रॉयल दिसेल.
बनारसी साडीमध्ये सर्वच रंग अतिशय सुंदर दिसतात. त्यात सगळ्यांच्या आवडीचा रंग म्हणजे हिरवा रंग. हिरव्या रंगाची बनारसी साडी कोणत्याही कार्यक्रमात तुम्ही नेसू शकता.