Weight Loss Drinks: आजकाल बरेच लोक फिटनेसबद्दल जागरूक होत आहेत आणि त्यासाठी इंटरमिटेंट फास्टिंगचा वापर केला जात आहे. इंटरमिटेंट फास्टिंग खूप प्रभावी ठरत असल्याचे आता समोर आले आहे. त्यामुळे पोट आणि कंबर नियंत्रणात आणण्यास मदत मिळते. दिवसातून 12 ते 14 तास न खाण्याचा सल्ला इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये दिला जातो. इंटरमिटेंट फास्टिंगमुळे पोटावरील चरबी काढून टाकण्यास मदत होते. आहारतज्ज्ञ आयुषी यादव यांच्या मते, इंटरमिटेंट फास्टिंगदरम्यान तुम्ही काही हेल्दी ड्रिंक्स प्यायल्यास तुमचे वजन झपाट्याने कमी होईल. (फोटो सौजन्य - iStock)
Intermittent Fasting हा पोटावरील चरबी कमी करण्याचा आणि वजन कमी करण्याचा उत्तम उपाय मानला जातो. हे करताना काही ड्रिंक्स पिणं तुमच्यासाठी उत्तम ठरते
स्वच्छ पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन तर राहतेच पण त्याचबरोबर शरीराची सर्व कार्ये व्यवस्थित होण्यास मदत होते. विशेषत: चयापचय क्रिया निरोगी राहते. पाणी पिऊन भूक काही प्रमाणात आटोक्यात ठेवता येते. त्यामुळे पुरेसे पाणी प्यावे
लिंबू पाण्याची गणना आरोग्यदायी पेयांमध्ये केली जाते ज्यात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते आणि कॅलरीजदेखील कमी असतात. हे चरबीचे ऑक्सिडेशन वाढवते आणि चयापचय वाढवते. जर तुम्ही सकाळी लिंबू पाणी प्यायले तर ते शरीर डिटॉक्स करण्यास मदत करेल, पचनक्रिया निरोगी राहील, त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल
नारळाच्या पाण्यात अत्यंत कमी कॅलरी असते आणि हे पाणी इलेक्ट्रोलाइट्सचा नैसर्गिक समृद्ध स्रोत आहे. केवळ हायड्रेशनच नाही तर उपवासाच्या काळात ऊर्जा पातळीदेखील नारळाच्या पाण्याने राखली जाऊ शकते. यामध्ये असलेली नैसर्गिक साखर भूक नियंत्रणात ठेवते, त्यामुळे तुम्हाला जास्त भूक लागत नाही
ग्रीन टीमध्ये कॅटेचिन आणि कॅफीन असतात, जे चयापचय वाढवण्यासाठी आणि चरबी जाळण्यासाठी उपयुक्त ठरतात. ग्रीन टी मधील अँटिऑक्सिडंट्स, विशेषत: एपिगॅलोकाटेचिन गॅलेट, थर्मोजेनेसिस वाढवतात आणि फॅट ऑक्सिडेशनला समर्थन देतात जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात
अॅपल सायडर व्हिनेगर पाण्याने पातळ करा आणि प्या. त्याच्या मदतीने, रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढते, ज्यामुळे वजन सहजपणे कमी करता येते. अॅपल सायडर व्हिनेगरदेखील भूक कमी करते आणि आपण जास्त अन्न खात नाही