आजकाल, अनेक अॅप्स युजर्सचं लोकेशन ट्रॅक करतात आणि महत्त्वाचं म्हणजे युजर्सना याबद्दल माहितीच नसतं. तुमच्या परवानगीशिवाय कोणताही अॅप तुमचं लोकेशन ट्रॅक करत असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. तुमचे लोकेशन कोणी ट्रॅक करावं की नाही, ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण तरीही, असे अनेक अॅप्स आहेत जे तुमचे लोकेशन ट्रॅक करतात आणि तुम्हाला त्याची माहितीही नसते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे लोकेशन एखाद्या अॅपद्वारे ट्रॅक केले जात आहे, तर आता आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने कोणतं अॅप तुमचं लोकेशन ट्रॅक करत आहे हे तुम्ही शोधू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Tech Tips: स्मार्टफोनमधील कोणते अॅप्स तुमचं लोकेशन ट्रॅक करतायत? ही पद्धत वापरून आताच करा चेक
सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तुम्हाला फोन सेटिंग्जमध्ये जाऊन अॅप पर्याय उघडावा लागेल.
यानंतर, खाली स्क्रोल करा आणि Privacy And Security पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला लोकेशन सर्व्हिस पर्यायावर क्लिक करावे लागेल.
आता तुम्हाला खाली दिलेल्या अॅप लिस्टमध्ये कोणते अॅप तुमचे लोकेशन शेअर करत आहे ते दिसेल.
जर तुम्हाला तुमचे स्थान कोणत्याही अॅपसोबत शेअर करायचे नसेल, तर तुम्ही तिथे त्या अॅपच्या आयकॉनवर क्लिक करू शकता.
यानंतर तुम्हाला Never, Ask Next Time किंवा When I Share, While Using App आणि Always हे पर्याय दिसतील, तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.
जर तुम्हाला तुमचे लोकेशन कोणत्याही अॅपसोबत शेअर करायचे नसेल, तर अशा प्रकारे तुम्ही ते थांबवू शकता आणि इतर पर्याय देखील निवडू शकता.