पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील भारतीय मेडलिस्ट : भारताने ११७ खेळाडूंची तुकडी पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये पाठवली होती. यंदा भारताच्या खेळाडूंनी आतापर्यत ६ पदक मिळवले आहेत. आज आणखी काही राहिलेले खेळाडू मेडलसाठी लढणार आहेत. अनेक खेळाडूंची स्वप्न ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याची तुटली आहे. त्याचबरोबर भारतीयांसाठी अनेक पॅरिस ऑलिम्पिकचे हे वर्ष वादग्रस्त राहिले. सर्वात मोठा वाद म्हणजेच विनेश फोगाटचे डिसक्वालिफिकेशन. त्यामुळे चाहत्यांची बऱ्याचदा निराशा झाली आहे. अनेक भारतीय ॲथलेटिक्स चौथ्या क्रमांकावर राहिले आणि त्यांचे ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले. यामध्ये भारताच्या कोणत्या खेळाडूंनी किती मेडल्स मिळवले आहेत यासंदर्भात आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
यंदा भारताच्या खेळाडूंनी आतापर्यत ६ पदक मिळवले आहेत. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४/मीडिया
भारताला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारी पहिली भारतीय महिला मनु भाकर हिने इतिहास रचला आहे. तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला कांस्य पदक मिळवून दिले आहे. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४
भारताच्या नेमबाजांनी दुसरे पदक सुद्धा शूटिंगमधून मिळवून दिले आहे. भारताची मिक्स टीम सरबजोत सिंह आणि मनु भाकर आणि भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक मिळवून दिले आहे. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४
५० मीटर रायफलमध्ये इतिहास घडवून भारताला रायफलमध्ये कांस्य पदक स्वप्नील कुसाळेने मिळवून दिले आहे. ५० मीटर रायफलमध्ये पदक मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४
भारतीय हॉकी संघाने केलेल्या कामगिरीमुळे त्यांची देशामध्ये कौतुक केले जात आहे. भारताला सलग दुसऱ्यांदा हॉकी संघाने कांस्य पदक मिळवून दिले आहे. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४
भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने त्याच्या दुसऱ्या ऑलिम्पिकमध्ये सिल्वर मेडल मिळवून इतिहास घडवला आहे. त्याने फायनलमध्ये ८९.४५ मीटरचा भाला फेकून दुसरे स्थान गाठले आहे. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४
भारताचा युवा कुस्तीपटू आणि ॲथलेटिक्स अमन शेरावतने भारताला सहावे पदक मिळवून दिले आहे. विनेश फोगाटच्या वादानंतर भारताला कुस्तीमधून पहिले पदक मिळाले आहे. फोटो सौजन्य - पॅरिस २०२४