नोबेल पारितोषिक 2024 ची घोषणा नुकतीच झाली, हा त्या विषयांपैकी एक आहे ज्यातून स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे. तुमच्यापैकी अनेकांनी नोबेल पारितोषिकाबद्दल ऐकले असेलच, पण आज नोबेल पुरस्काराच्या इतिहासासोबत हे देखील जाणून घ्या की अल्फ्रेड नोबेल कोण होते. डॉक्टर आल्फ्रेड नोबेल यांच्या नावाने नोबेल पारितोषिक सुरु झाले. डॉक्टर आल्फ्रेड नोबेल यांना मृत्यूचे व्यापारी देखील म्हटलं जात होतं. आता आपण त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया.
कोण होते डॉक्टर आल्फ्रेड नोबेल, ज्यांच्या नावाने सुरू झाले नोबेल पारितोषिक (फोटो सौजन्य - pinterest)
नोबेल पुरस्कार म्हणजे काय? चर्चेत का आहे? नोबेल पुरस्कार कधी सुरू झाला? नोबेल पुरस्काराची स्थापना केव्हा झाली? नोबेल पारितोषिक कोणाला दिले जाते? डॉ. अल्फ्रेड कोण होते, त्यांच्या नावावर नोबेल का ठेवले गेले? डॉ. आल्फ्रेड नोबेलचा इतिहास? आज आपण सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.
आल्फ्रेड नोबेल यांचा जन्म स्वीडनमध्ये झाला होता, तर त्यांचा मृत्यू 1896 मध्ये इटलीमध्ये झाला होता. डॉ.आल्फ्रेड नोबेल हे महान संशोधक होते आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा होता. डॉ. आल्फ्रेड नोबेल यांनी अनेक शोध लावले, परंतु सर्व शोधांमध्ये सर्वात मोठे नाव डायनामाइटचे होते, ज्याला गनपावडर या नावाने देखील ओळखलं जातं.
डॉक्टर अल्फ्रेड नोबेल यांनी 25 नोव्हेंबर 1867 रोजी डायनामाइट शोधून त्याचे पेटंट घेतले. आल्फ्रेड नोबेलच्या नावावर 355 पेटंट मिळणे ही एक मोठी गोष्ट आहे.
1888 मध्ये डॉ.आल्फ्रेड नोबेल यांचा भाऊ लुडविक यांचा मृत्यू झाला. यावेळी मिडीयाने चुकून डॉ.आल्फ्रेड नोबेल यांचा मृत्यू झाल्याचं लिहील. डायनामाइट स्फोटक म्हणून काम करत असल्याने लोकांच्या नजरेत ते मृत्यूचे व्यापारी म्हणून ओळखले जाऊ लागले.
डॉ. आल्फ्रेड नोबेल यांना वाटले की त्यांची प्रतिमा बिघडत आहे आणि त्यांनी आपली प्रतिमा सुधारली पाहिजे, म्हणून त्यांनी आपल्या संपत्तीचा एक मोठा भाग (सुमारे 94 टक्के) औषध, साहित्य, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, अर्थशास्त्र आणि शांतता या क्षेत्रात ज्यांनी अतुलनीय योगदान दिले, त्यांना समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
नोबेल पारितोषिकाच्या इतिहासाबद्दल बद्दल बोलायचे तर, पुरस्कार सोहळा प्रथमच 10 डिसेंबर 1901 रोजी स्टॉकहोम आणि ख्रिस्तियानिया येथे आयोजित करण्यात आला होता.