वातावरणात होणाऱ्या बदलांचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर साथीच्या आजारांची शरीराला लागण होते., आजारपण वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर व्यवस्थित तपासणी करून डॉक्टर वेगवेगळ्या रंगीत गोळ्या देतात. डॉक्टरांकडे कायमच वेगवेगळ्या रंगाच्या गोळ्या आणि कॅपसुल्स असतात. गोळ्या केवळ पांढऱ्या रंगाच्या नसून लाल, हिरव्या, निळ्या आणि इतरही वेगवेगळे असतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोळ्या आणि कॅपसुल्स रंगीबेरंगी का असतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)
गोळ्या आणि कॅपसुल्स का असतात रंगीबिरंगी? जाणून घ्या यामागील सविस्तर कारण

रंगीत औषधांचा ट्रेंड पहिल्यांदा 1960 च्या दशकात सुरु झाला होता. त्यामुळे हल्ली सर्वच कंपन्या गोळ्यांच्या रंगांकडे विशेष लक्ष देत आहेत. सर्दी खोकला किंवा ताप आल्यानंतर डॉक्टर लाल, पांढऱ्या आणि हिरव्या रंगाच्या गोळ्या रुग्णांना देतात.

इजिप्शियन संस्कृतीत पहिल्यांदाच गोळ्या वापरण्यात आल्या होत्या. त्यावेळी औषध माती आणि ब्रेडमध्ये मिक्स करून दिली जायची. त्यानंतर पुढे 5000 वर्षे, 20 व्या शतकापर्यंत, औषधे गोलाकार आणि पांढऱ्या रंगाची होती. मात्र कालांतराने 1960 च्या दशकात आणि १975 मध्ये, सॉफ्टजेल कॅप्सूल तयार करण्याची तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. त्यानंतर पहिल्यांदाच औषधे चमकदार लाल, पिवळ्या, हिरव्या आणि चमकदार पिवळ्या रंगात पाहायला मिळाली होती.

रंगीत औषध दिसायला खूप सुंदर दिसतात. कंपन्यांकडून औषधांची विक्री व्हावी म्हणून गोळ्यांचा रंग उठावदार ठेवण्यात आला होता. वयस्कर व्यक्ती पांढऱ्या गोळ्या पाहून बऱ्याचदा गोंधळून जातात, ज्यामुळे चुकीच्या औषधाचे सेवन केले जाते.

अमेरिकेतील अभ्यासानुसार, जे लोक नियमित गोळ्यांचे सेवन करतात, त्यांना रंगीत आणि तेजस्वी औषध पाहायला खूप जास्त आवडतात. रंगीत औषधे केवळ भावनिक आकर्षणासाठी चांगली नसतात तर चुकीची औषधे घेण्याचा धोका कमी करण्यासाठी असतात.

गोळ्या औषधांच्या रंगांवरून सुद्धा रुग्णांचा प्रतिसाद घेतला जातो. औषधांचा रंग त्याच्या चवीवरून आणि वासावरून ठरवला जातो.






