सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी भूक लागल्यानंतर लहान मुलांसह मोठ्यांना बिस्कीट खाण्याची सवय असते. चहा किंवा दुधासोबत बिस्कीट आवडीने खाल्ले जाते. बाजारात अनेक वेगवेगळ्या ब्रँडचे आणि विविध पदार्थांचा वापर करून बनवलेले बिस्कीट सुद्धा उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या डिझाईनची बिस्कीट तुम्ही कायमच पहिली असतील. पण नमकीन बिस्किटांवर असलेली लहान लहान छिद्र तुम्ही पहिलीच असतील.यामागे काही तांत्रिक कारणे आहेत. चला तर जाणून घेऊया नमकीन बिस्किटांवर छिद्र का असतात? (फोटो सौजन्य – istock)
आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या नमकीन बिस्किटांना छिद्र का असतात? कारण वाचून व्हाल आश्चयचकित

तयार केलेली बिस्कीट ओव्हनमध्ये बेक केली जातात, तेव्हा त्यातील वाफ आणि हवा बाहेर जाणे आवश्यक आहे. पण वाफ बाहेर न गेल्यास बिस्कीट कडक किंवा फुगण्याची जास्त शक्यता असते. पण बिस्किटांवर असलेल्या छिद्रांमुळे वाफ सहज बाहेर पडून जाते.

बिस्किटांवर असलेल्या लहान लहान छिद्रांना तांत्रिक भाषेत 'डॉकिंग होल्स' असे सुद्धा म्हंटले जाते. यामुळे बिस्कीट व्यवस्थित भाजली जातात आणि कुरकुरीत होतात.

नमकीन किंवा इतर कोणतीही बिस्कीट कुरकुरीत असणे फार महत्वाचे आहे. छिद्रांमुळे बिस्किटांमधील ओलावा पूर्णपणे निघून जातो आणि बिस्कीट व्यवस्थित भाजल्यामुळे दीर्घकाळ टिकून राहतात.

नमकीन बिस्किटांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. यामुळे हवेतील ओलावा बिस्कीट सहज शोषून घेतात. तयार केलेली बिस्कीट लवकर भाजण्यासाठी आणि त्यातील ओलावा कमी करण्यासाठी बिस्किटांना छोटे छिद्र केले जातात.

बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वच बिस्किटांमध्ये लहान लाहान छिद्र असतात.ही छिद्र केवळ सुंदर दिसण्यासाठी नाहीतर बिस्कीट जास्त वेळ टिकून राहण्यासाठी सुद्धा काढली जातात.






