आपल्या स्मार्टफोनवर फोन लावताच सर्वात पहिला बोल्ला जाणारा शब्द म्हणजे 'हॅलो'. आज लहान असो वा कुणी मोठा व्यक्ती फोन आला की तो उचलताच हॅलो म्हणणं हे जणू एक परंपराच झालं आहे. पण तुम्हाला यामागची मनोरंजक कथा माहिती आहे का? हॅलो शब्द बोलण्याची परंपरा नक्की कशी आणि कुणामुळे चालू झाली ते चला जाणून घेऊया.
फोन उचलताच Hello का बोललं जात? उत्तर ऐकाल तर विश्वासच बसणार नाही

टेलिफोनचा शोध अलेक्झांडर ग्राहम बेल यांनी लावला. हा मानवी इतिहासातील सर्वात प्रमुख शोध होता. आजकाल फोन लावताच पहिला शब्द हॅलो बोलण्याची परंपरा नित्यनियमाने पाळली जाते.

पण तुम्हाला माहिती आहे का? हॅलो बोलण्याची ही परंपरा सुरवातीला नव्हती. असे म्हटले जाते की टेलिफोनवर 'अहोय' हा शब्द वापरणारे ग्रॅहम बेल हे पहिले होते.

१८७७ मध्ये, विजेच्या बल्बचा शोध लावणारे थॉमस एडिसन यांनी फोन उचलताना 'हॅलो' हा शब्द उच्चारण्याचा सल्ला दिला. एडिसनचा असा विश्वास होता की 'हॅलो' हा शब्द उच्चारण्यास सोपा, ऐकण्यास स्पष्ट आणि लवकर समजणारा आहे.

थॉमस एडिसनच्या या सल्ल्याचे पुढे जाऊन पालन करण्यात आले आणि हळूहळू जगभरात फोन उचलताच हॅलो म्हणण्याची परंपरा सुरु झाली.

एका कथेनुसार, ग्रॅहम बेलच्या गर्लफ्रेंडचे नाव "हॅलो" असे होते आणि त्यावरून हे नाव घेण्यात आले. तथापि, यासाठी कोणताही ठोस पुरावा नाही आहे.






