Maharashtra Breaking News Updates Today:
Marathi Breaking News Updates : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा आणि त्यानंतर झालेल्या उच्च्चस्तरीय भेटींमुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीला केवळ शिष्टाचार म्हणून पाहायचे की त्यातून काही व्यापक राजकीय संकेत दडले आहेत, यावर राजकीय वर्तुळात मतमतांतरे आहेत.
दिल्लीतील भेटी आणि आगामी पत्रकार परिषद या दोन्ही घटनांमुळे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील संबंध, सत्तेतील स्थान आणि भविष्यातील राजकीय दिशा, याबाबतचे चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. सध्या तरी विलीनीकरणाची शक्यता मावळल्याचे संकेत दिसत असले, तरी अंतिम निष्कर्षासाठी पुढील घडामोडी निर्णायक ठरणार आहेत.






