मुलांचे व्यक्तिमत्व मुलींच्या तुलनेत धीट आणि धाडसी असे दाखवले जाते. जे काही अर्थी खरे देखील असते.मुलांना लहानपणापासूनच असे वाढवले जाते की आयुष्यात मोठ्यातला मोठा प्रसंगाना ते तोंड देऊ शकतील. पण काही वेळेस हीच धाडसी मुलं मुलींसमोर बोलायला देखील कचरत असतात. याला अनेक परिस्थिती कारणीभूत ठरू शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे मुलं मुलींसमोर व्यक्त होण्यास घाबरतात (फोटो सौजन्य: iStock)
प्रपोजल: मुलांच्या आयुष्यात अनेक असे प्रसंग येतात, जेव्हा ते आपल्या मनातील भावना बोलताना घाबरतात. खासकरून जेव्हा ते प्रेमात असतात. अशावेळी त्यांना आपल्या मनातील भावनांचा बांध मोकळा करण्यास वेळ लागतो. काही वेळेस तर भावना मनातल्या मनात तशाच राहतात.
पहिली डेट: आपल्या प्रेयसीसोबत असणाऱ्या पहिल्या डेटच्या वेळी मुलं अनेकदा नर्व्हस आणि कावरे बावरे होतात. त्यांना काय बोलावे हेच सुचत नाही. त्यांना असे देखील वाटते की आपल्या अनपेक्षित वागणुकीमुळे प्रेयसीला वाईट वाटेल.
लग्नाची मागणी: आपल्या प्रेयसीचा हात तिच्या घरासमोर खासकरून वडिलांसमोर मागताना मुलं घाबरत असतात. मुलीच्या घरच्यांनी त्याला रिजेक्ट केले तर काय होईल याचे त्यांना टेन्शन असते.
ब्रेकअपची भीती: जर एखादा मुलगा एका मुलीवर प्रचंड प्रेम करत असेल तर त्याच्या मनात ब्रेकअपची सुद्धा भीती असते. कारण त्यांना त्यांच्या प्रिय व्यक्तीला गमवायचे नसते.
पहिल्यांदाच घरच्यांना भेटणे: जेव्हा मुलं पहिल्यांदाच आपल्या प्रेयसीला त्यांच्या कुटुंबीयांसोबत भेटवतात, तेव्हा त्यांच्या मनात एक वेगळीच भीती असते. हीच भीती प्रेयसीच्या कुटुंबियांना भेटताना सुद्धा असते.