दक्षिण भारतीय लोक केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन करावे. ही परंपरा पूर्वीच्या काळापासून चालत आली आहे. डिजिटल युगात अनेक नवनवीन बदल होताना दिसून येत आहे.मात्र हे बदल अन्नपदार्थांमध्ये आणि त्यांच्या परंपरेमध्ये बदल झालेला नाही. स्टील, सिरॅमिक किंवा प्लॅस्टिकच्या प्लेटमध्ये कायमच अन्नपदार्थांचे सेवन केले जाते.केळीच्या पानांवर जेवणे ही केवळ प्रथा नसून यामागे अनेक वैज्ञानिक कारणे सुद्धा आहेत. केळीचे पान उष्ण असते, त्यामुळे या पानांतील उष्णता अन्नपदार्थांमध्ये मिक्स होते आणि पदार्थाची चव वाढते. चला तर जाणून घेऊया केळीच्या पानांत जेवण्याचे फायदे. (फोटो सौजन्य – istock)
केळीच्या पानांवर अन्नपदार्थांचे सेवन का करावे? जाणून घ्या केळीच्या पानांवर जेवण्याचे शरीराला होणारे आश्चर्यकारक फायदे

केळीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट्स आढळून येतात. हे घटक आहारात मिक्स झाल्यास शरीराची पचनक्रिया सुधारते. याशिवाय गंभीर आजारांपासून शरीराचा बचाव होतो.

सामान्य प्लेट किंवा प्लॅस्टिकच्या प्लेटपेक्षा केळीची पाने अतिशय चांगली आहेत. यामुळे अन्नपदार्थांची चव वाढते. केळीच्या पानांतील अन्नाचा प्रत्येक घास शरीरासाठी फायदेशीर आहे.

केळीच्या पानात जेवल्यास आहाराचा सुगंध आणि रंग वाढतो. तसेच जेवणात चार घास जास्त जातात. यामुळे मन फ्रेश आणि ताजेतवाने वाटते.

केळीच्या पानांवर वाढलेले जाणारे अन्नपदार्थ अतिशय शुभ असतात. गरम अन्नपदार्थ पानावर वाढल्यानंतर केळीच्या पानांतील अँटी-ऑक्सिडंट्स अन्नात मिक्स होतात.

पानांमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात, ज्यामुळे अन्नाची चव आणि गुणवत्ता कायम टिकून राहते. तसेच अन्नपदार्थ लवकर खराब होत नाहीत.






