हिंदू धर्मात व्यक्तीच्या मृत्यूनंरही अनेक विधी केले जातात. यासोबतच अनेक मान्यता देखील आहेत, ज्यांचे कुटुंबाद्वारे पालन केले जाते. यातीलच एक मान्यता म्हणजे, शमशानाच व्यक्तीला अग्नी दिल्यानंतर कधीही मागे वळून पाहू नये. सनातन धर्मात एकूण १६ संस्कारांचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी १६ वा संस्कार मृत्यूनंतरच्या संस्काराशी संबंधित आहे. या संस्काराचे अनेक नियम आहेत जे पाळले गेले पाहिजेत आणि यापैकीच एक म्हणजे, स्मशानभूमीकडे मागे वळून पाहू नये. असे केल्यास काय होईल ते आज आपण जाणून घेणार आहोत.
अंत्यसंस्कारानंतर मागे वळून का पाहू नये? गरुड पुराणानुसार काय आहेत याचे परिणाम; चला जाणून घेऊया
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादी व्यक्ती मरते तेव्हा त्याचा आत्मा शरीर सोडतो. अंत्यसंस्कारानंतर, शरीराचे राखेत रुपांतर होते परंतु शरीर जरी नष्ट झालं असलं तरी व्यक्तीचे आत्मा जिवंत राहतो
गरुड पुराणानुसार, जेव्हा एखादा व्यक्ती मरतो तेव्हा त्याचा आत्मा दुसऱ्या देशात प्रवेश करतो मात्र जेव्हा मृताच्या कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहतात तेव्हा आत्म्याचे कुटुंबाबद्दलचे प्रेम त्याला दुसऱ्या जगात जाण्यापासून रोखते
मृत व्यकतीचे कुटुंबाय स्मशामभूमीत उपस्थित असतात, ज्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने अंत्यसंस्काराच्या वेळी मागे वळून पाहिले तर मृताचा आत्मा त्या व्यक्तीशी पूर्णपणे जोडला जातो आणि हे बंधन तुटू शकत नाही
धार्मिक मान्यतेनुसार, अंत्यसंस्कारानंतर मागे वळून पाहू नये कारण अशा परीस्थितीत आत्म्याला परलोकात जायला अडचण निर्माण होते. गरुड पुराणात असे नमूद करण्यात आले आहे की, घरी परतताना मागे वळून पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येऊ शकते.
चूकून जर तुम्ही मागे वळून पाहिलेच तर घरी येऊन शेणाच्या सुकलेल्या गोळ्यांना आग लावून आपले हातपाय शेकवून घ्या. यानंतर, लोखंड, दगड किंवा पाण्याला स्पर्श करा. मग एक दगड घ्या आणि मागे फेकून द्या. यानंतर पाणी शिंपडा, कडूलिंबाची पाने आणि मिरच्या चावा आणि थुंकून टाका.