तुम्ही जर KGF चित्रपट पाहिला असेल तर यात तुम्ही सोन्याची खाण जरूर पाहिली असावी. मात्र प्रत्यक्षात तुम्ही कधी सोन्याची खाण पाहिली आहे का? चीन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या मोठ्या देशांमध्ये सोन्याच्या मोठ्या खाणी अस्तित्वात आहेत. मात्र तुम्हाला माहिती आहे का? जगभरात एका ठिकाणी सोन्याची सर्वात मोठी खाण आढळली जाते.
जगातील असे एक ठिकाण जिथून रोज निघतं कैक क्विंटल सोनं, कुठे आहे ही जागा?
अमेरिकेतील नेवादा इथे जगातील सर्वात मोठी सोन्याची खाण आहे, इथे अमेरिकेतील सोन्याचा 75 टक्के पुरवठा केला जातो. सोन्याच्या खाणीचा गड अशी याची ओळख आहे
सोन्याच्या उत्पादनामध्ये नेवादाचं सर्वात मोठं योगदान आहे. 19 व्या शतकात या खाणीचा शोध लागला होता आणि तेव्हापासूनच या खाणी आर्थिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जातात
नेवादा इथे असणाऱ्या या सोन्याच्या खाणीमुळे स्थानिक अर्थसत्तेला चालना मिळाली असून नेवादातील या खाणींमध्ये 'कार्लिन ट्रेंड'चं नाव आवर्जून घेतले जाते. कार्लिन ट्रेंडमध्ये माइक्रोस्कोपिक सोन्याचे कण सापडतात, ज्यांना 'कार्लिन-स्टाइल गोल्ड डिपॉजिट्स' म्हटले जाते
नेवादातील या कार्लिन ट्रेंडमधून आतापर्यंत 70 मिलियन औंस म्हणजेच (19 लाख किलोग्राम) पेक्षा जास्त सोन्याचं उत्पादन घेण्यात आलं आहे. या प्रक्रियेसाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जातो
नेवादाच्या सोन्याच्या खाणींमुळे मोठ्या प्रमाणात स्थानिक रोजगार निर्माण झाला असून खाणींमध्ये काम करणाऱ्या कुटुंबांनाही मोठा आर्थिक आधार मिळाला आहे