आपण पैशाने कोणतीही गोष्ट विकत घेऊ शकतो, असं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. आपण आतापर्यंत एखादं घर किंवा खोली भाड्यानी घेतली असेल. पण तुम्ही कधी एखादा देशा भाड्याने घेण्याची कल्पना केली आहे? होय तुम्ही बरोबर वाचलं आहे. जगात असा एक देश आहे, जो तुम्ही भाड्याने घेऊ शकता. वाचून आश्चर्य वाटत असलं तरी देखील हे खरं आहे. आता आपण अशाच एका देशाबद्दल जाणून घेणार आहोत, जो तुम्ही भाड्याने घेऊ शकता. (फोटो सौजन्य - pinterest)
घर किंवा रुम नाही तर इथे चक्क देश भाड्याने घेता येतो! एवढी आहे एका दिवसाची किंमत
तुम्ही कधी ऐकलं आहे का की तुम्ही एखादा देश भाड्याने घेऊ शकता? आपण फिरायला जातो तेव्हा राहण्यासाठी हॉटेल किंवा खोली भाड्याने घेतो. पण एखाद्याने देश भाड्याने घेतल्याचे तुम्ही ऐकलं आहे का?
वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे. जगात असा एक देश आहे जो भाड्याने मिळू शकतो. या देशाचे नाव लिकटेंस्टीन आहे.
लिकटेंस्टीन हा स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रिया यांच्यामध्ये युरोपच्या मध्यभागी असलेला लँडलॉक देश आहे. त्याचे क्षेत्रफळ फक्त 160 किमी² आहे आणि त्याची लोकसंख्या सुमारे 39,000 आहे.
लिकटेंस्टीन हे सुंदर टेकड्या, नद्या आणि सांस्कृतिक वारसा यांसाठी ओळखले जाते. येथील लोकांचा त्यांच्या परंपरांवर मनापासून विश्वास आहे आणि हे ठिकाण शांतता आणि मैत्रीचे प्रतीक आहे.
लिकटेंस्टीनच्या भाड्याबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्ही हा देश एका दिवसासाठी 70,000 यूएस डॉलर्समध्ये भाड्याने घेऊ शकता. येथील सरकारने 2010 मध्ये हा देश भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. तुम्ही इथे गावही भाड्याने घेऊ शकता.
लिकटेंस्टीनला भेट देण्याचा सर्वोत्तम काळ म्हणजे उन्हाळा. जेव्हा येथील हवामान आल्हाददायक असते. लिकटेंस्टीन युरोपियन युनियनचा भाग नाही, परंतु शेंजेन क्षेत्राचा सदस्य आहे. जर तुम्ही शेंजेन व्हिसाधारक असाल तर तुम्हाला येथे येण्यास कोणतीही अडचण येणार नाही.