देशात झपाट्याने वाढणाऱ्या इंटरनेट आणि स्मार्टफोनमुळे लोकांची अनेक कामे कमी वेळेत सहज होतात. AI म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता देशात सतत आपली व्याप्ती वाढवत आहे. AI आल्यानंतर एकीकडे लोकांना फायदा झाला, तर दुसरीकडे काही लोक त्याचा गैरवापरही करताना देखील पाहायला मिळत आहे.
'या' चुका केल्यास तुमचं YouTube चॅनल होईल बंद! व्हिडीओ अपलोड करताना काळजी घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
अनेक लोक AI च्या मदतीने YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चुकीचा व्हिडिओ कंटेट अपलोड करतात. अशा परिस्थितीत, जर तुमचे देखील YouTube चॅनेल असेल तर तुमच्याकडे याबाबत माहिती असणं आवश्यक आहे.
YouTube वर खोटी माहिती पोस्ट केल्यामुळे चॅनल बंद केले जाऊ शकते.
YouTube च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, YouTube चॅनलवर कोणत्याही प्रकारची चुकीची सामग्री, कोणतीही दिशाभूल करणारी माहिती, हिंसक माहिती किंवा स्पॅम कंटेट अपलोड केलं जात असल्यास, चॅनल बंद केले जाऊ शकते.
प्लॅटफॉर्मवर एखाद्याच्या कंटेंटशी छेडछाड किंवा कॉपी केल्यास चॅनलही बंद केले जाऊ शकते. YouTube कंटेट निर्मात्याच्या मंजुरीशिवाय कंटेटशी संबंधित संगीत किंवा व्हिडिओ चोरीला गेल्यास, चॅनेल बंद केले जाईल.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म YouTube अनेक निर्मात्यांसाठी कमाईचा स्रोत आहे. मात्र अनेकजण या व्यासपीठाचा गैरवापर करतात. अनेक निर्माते बनावट सबस्क्राईबर्स वापरतात आणि त्यांचे चॅनल प्रसिद्ध करण्यासाठी खोटे व्ह्यू आणि लाईक्स वाढवतात.
YouTube प्लॅटफॉर्मवरून चांगली कमाई केली जाऊ शकते हे तुम्हाला आधीच माहित आहे. पण हे प्लॅटफॉर्मच्या मर्यादेत आणि नियमानुसार करावे लागेल.