Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 18 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vidhan Parishad Elections 2026: प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर..; अहिल्यानगर विधानपरिषदेची बदलणार समीकरणे

Ahilyanagar News :प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे अहिल्यानगर निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवली तर या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

  • By anuradha sagar
Updated On: May 29, 2026 | 10:34 AM
Ahilyanagar MLC Election 2026 updates, Prajakt Tanpure BJP entry rumors

Ahilyanagar MLC Election 2026 updates, Prajakt Tanpure BJP entry rumors

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग
  • प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात
  • अरुण जगताप यांचे पुत्र सचिन जगताप यांनीदेखील दावा केला
Vidhan Parishad Elections 2026:  राज्यातील विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच वाढत चालली आहे. इच्छुक उमेदवारांकडून पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू झाले आहे. यामुळे अनेक मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

अहमदनगर विधान परिषदेची जागा सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे.पण प्राजक्त तनपुरे भाजपच्या वाटेवर असल्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. अहिल्यानगर विधान परिषद मतदारसंघाचे माजी सदस्य अरूण जगताप यांच्या निधनानंतर ती जागा रिक्त झाली. त्यांच्या या जागेवर कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Solapur Gram Panchayat Election: ग्रामीण राजकारणाचा पारा चढणार! सोलापूरमधील ७०१ ग्राम

या जागेवर अरुण जगताप यांचे पुत्र सचिन जगताप यांनीदेखील दावा केला आहे. त्यासाटी त्यांनी उमेदवारी अर्जही घेतल्यान चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच अंतर्गत स्पर्धा वाढल्याचे चित्र दिसत आहे.

भाजपकडूनही हालचाली वेगात

दुसरीकडे, या जागेसाठी भाजपकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. भाजपचे सत्यजित कदम यांनी विधान परिषदेवर दावा केला आहे. पक्षातील निष्ठावंत कार्यकर्त्यंना संधी द्यावी, अशी मागणी सत्यजित कदम यांनी केली आहे. याशिवाय राम कदम यांनीदेखील निष्ठावंत आणि कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे संकेत दिल्याने भाजपमधील इच्छुकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

‘पेट्रोलचे दर प्रतिलिटर 170 तर डिझेलचे 150 रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता’; ‘या’ बड्या नेत्याने व्यक्त केली चिंता

प्राजक्त तनपुरेंच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान, प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांमुळे अहिल्यानगर निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढवली तर या मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केली जात आहे.

अमरावतीत भाजपने पुन्हा प्रवीण पोटे पाटील यांच्यावर विश्वास

अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. खास बाब म्हणजे प्रवीण पोटे पाटील यांना सलग तिसऱ्यांदा त्यांना संधी देण्यात आली असून यापूर्वीच्या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांनी एकतर्फी विजय मिळवला होता. महाविकास आघाडीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नसला तरी राजकीय हालचालींना वेग आला आहे. सुरुवातीला २९ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे नियोजन असले तरी आता प्रवीण पोटे पाटील १ जून रोजी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल करणार आहेत.

 

Web Title: Ahilyanagar mlc election 2026 updates prajakt tanpure bjp entry rumors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 10:34 AM

Topics:  

  • Ahilyanagar politics
  • Maharashtra Politics
  • NCP Politics
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?
1

Ektnath Shinde: अमरावतीत उद्या राजकीय रणधुमाळी! एकनाथ शिंदेंच्या सभेत कोणता मुद्दा गाजणार?

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका
2

Sambhajinagar News: ५ हजारांत दिवाळी कशी करायची? शेतकऱ्यांची चेष्टा थांबवून १ लाख द्या : रोहित पवारांची टिका

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक
3

Maharashtra Live Breaking News in Marathi: दिल्ली,मुंबईनंतर आज पुणे आणि नागपुरात ‘लहरा दो तिरंगा’ आंदोलनाची हाक

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा
4

Baramati News: जे’जेन झी’चे भविष्य अन् विकसित महाराष्ट्राचा संकल्प; १८ ऑक्टोबरला जेजुरीत विशेष दसरा मेळावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.