Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; आता ‘प्रहार’चे काय होणार?

बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 30, 2026 | 12:14 PM
मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; 'प्रहार'चा अवतार समाप्त

मोठी बातमी ! बच्चू कडू करणार शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश; 'प्रहार'चा अवतार समाप्त

Follow Us
Follow Us:

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच आता प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांच्या पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरु असताना बच्चू कडू यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार आहेत.

बच्चू कडू यांच्या शिवसेनेच्या प्रवेशावर अनेक चर्चा सुरु होत्या. त्यातच आमदारकीसाठी पक्ष संघटना विलीन करणार नसल्याची ठाम भूमिका बच्चू कडू यांनी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रहार संघटना विलीन होणार असल्याच्या चर्चांना सध्या कोणताही आधार नसल्याचे कडू यांनी स्पष्ट केले होते. प्रहार ही कार्यकर्त्यांनी उभी केलेली संघटना असून, तिचे राज्यभर जाळे आहे. एका पदासाठी सत्तेसोबत जाणार नाही, असे स्पष्ट करत सर्व पर्याय खुले असल्याचे संकेतही कडू यांनी यापूर्वी दिले होते. मात्र, आता त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे म्हटले आहे.

Bachchu Kadu on Shivsena : प्रहार संघटना शिवसेनेत विलीन होणार? बच्चू कडूंनी स्पष्टच सांगितलं

दरम्यान, बच्चू कडू यांनी दावा केला की, प्रहार जनशक्ती संघटनेचे महाराष्ट्रभरात अंदाजे 1 लाख सदस्य आहेत आणि 5 ते 6 लाख दिव्यांग व्यक्ती या संघटनेशी संबंधित आहेत. प्रहार केवळ विदर्भ किंवा अमरावतीपुरता मर्यादित नाही, तर शिक्षक, कामगार आणि दिव्यांग संघटनांच्या माध्यमातून राज्यात अस्तित्व आहे.

प्रहार संघटना कायम राहणार

पेरणीपासून ते कापणीपर्यंची चर्चा झाली, दिव्यांगाच्या, आदिवासींच्या संदर्भात चर्चा झाली, त्यांनी सहमती दर्शवली, ज्यासाठी आम्ही मंत्री होतो, आमदार होतो, ज्यासाठी आम्ही आहे, तो होत असेल तर विरोध काय असंही पुढे कडू म्हणाले, संघटना या काळात चालवणं फार कठिण आहे, माझं काम आहे, कार्यकर्ता म्हणून प्रामाणिकपणे काम करणं, जन्म शिवसेनेचा आणि शेवटही शिवसेनेत व्हावा, असंही कडू पुढे म्हणाले. प्रहार संघटना राहिलं, ज्याला सामाजिक काम करायचं आहे, त्यासाठी प्रहार राहिलं, तर राजकीय इच्छुकांनी शिवसेनेत प्रवेश करावा, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे.

अनेक मुद्यांवर व्यक्त केले मत

पेरणी ते कापणीपर्यंतची कामे MRGS च्या माध्यमातून झाली पाहिजे, शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत. हमीभावाचा मुद्दा आहे, शिंदेसाहेबांनी आमचा विचार केला तर आमचाही प्रस्ताव आहेत. आम्ही पदासाठी आमदारकी घेणार नाही, पदासाठी किंवा निवडणुकीसाठी युती करणारे नाही, बच्चू कडूची युती मुद्द्याची आहे. आमचे जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्यावरील भूमिका स्पष्ट केली पाहिजे. त्यासंदर्भातील प्रस्ताव आम्ही एकनाथ शिंदे यांना देऊ, निव्वळ आमदारकीसाठी जावं, एवढा नालायक बच्चू कडू नाही, असे कडू यांनी यापूर्वीच म्हटले होते.

Web Title: Bachchu kadu to join shindes shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Bachchu Kadu
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • political news
  • shivsena

संबंधित बातम्या

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन
1

BJP National President : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणरायाचे घेतले दर्शन

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन
2

Maharashtra Cabinet Decisions: देवेंद्र फडणवीसांचे मोठे निर्णय! ‘महा-टॅक’ कक्ष स्थापन; साखर कारखान्यांना मिळणार सॉफ्ट लोन

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’
3

Eknath Shinde : ‘मुंबईत येण्याचा निर्णय पुन्हा विचार करा’; एकनाथ शिंदेंचं मनोज जरांगेंना आवाहन, ‘गणेशोत्सवात विघ्न नको’

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’
4

शिवसेना शिंदेंचीच? सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा जोरदार युक्तिवाद, ‘आमदार-खासदारांची वेगळी भूमिका म्हणजे राजकीय फूट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.