Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By-Poll: बारामतीत पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला! प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक’

कृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना आज दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृतीमुळे प्रत्यक्ष सभेला येणे शक्य नसले तरी त्यांनी सोशल मीडियाद्वारे आपली भूमिका मांडली.

  • By anuradha sagar
Updated On: Apr 23, 2026 | 11:48 AM
Baramati Politics, Sharad Pawar, Sunetra Pawar, Ajit Pawar, Maharashtra Politics,

Baramati Politics, Sharad Pawar, Sunetra Pawar, Ajit Pawar, Maharashtra Politics,

Follow Us
Follow Us:
  • सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी बारामतीत आज भव्य सांगता सभा पार पडली
  • प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांना आज दुपारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
  • प्रकृती बिघडल्याने शरद पवार यांचे रुग्णालयातूनच ट्विट करत बारामतीकरांना मतदारांना मतदानाचे आवाहन
 

Baramati Assembly bypoll Elections 2026 :  राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा आज बारामतीत पार पडली. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुनेत्रा पवार यांच्यासह संपूर्ण पवार कुटुंबियांनी बारामती पिंजून काढली होती. त्यानंतर आज बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठीची सांगता सभा पार पडली. या सभेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्यासह प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे  यांनी उपस्थिती लावली.

पण त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार शरद पवार हे मात्र या सभेला हजर राहू शकले नाही. शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे आज दुपारच्या सुमारास त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे ही प्रचाराची सांगता सभा पार पडत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी रुग्णालायतून एक ट्विट करत बारामतीकरांना सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केलं आहे.

Sharad Pawar Health News: शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल; प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारामती दौरा रद्द

वाचा काय म्हटलं आहे शरद पवार यांनी ट्विटमध्ये?

“मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत आहे.

या पोटनिवडणुकीसाठी बारामती येथे येऊन आतापर्यंतच्या प्रघातानुसार मतदान करण्याचे मी ठरवले होते. दुर्दैवाने माझी प्रकृती बिघडल्याने मला मुंबईत रुग्णालयात दाखल व्हावे लागले. डॉक्टरांनी मला उपचार आणि सक्तीची विश्रांती या कारणास्तव मुंबईबाहेर जाण्यास मनाई केली आहे. त्यामुळे अत्यंत नाईलाजास्तव मतदानाचा हक्क बजावण्यापासून मला वंचित रहावे लागत आहे, हे मी अत्यंत व्यथित आणि खेदपूर्ण अंत:करणाने सांगू इच्छितो. माझ्यावर अथक प्रेम व विश्वास असलेले बारामतीचे नागरिक, मतदार व कार्यकर्ते मला समजुन घेतील याची मी खात्री बाळगतो.

रत्नागिरीकरांसाठी खुशखबर! उन्हाळी सुट्ट्यांसाठी एसटी सज्ज; तब्बल ‘इतक्या’ जादा बसेसचे नियोजन

आमच्या पक्षाने (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार) या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला आहे. स्व. अजित पवार यांना ही एकप्रकारे आमच्या पक्षातर्फे श्रद्धांजलीच आहे. माझे बारामतीमधील सर्व मतदारांना आवाहन आहे की, त्यांनी श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करून स्व. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करावी.

बारामतीमधील मतदार यांनी माझ्यावर प्रदीर्घ विश्वास ठेवलेला आहे. ते या आवाहनास प्रतिसाद देतील, असा मला विश्वास आहे.

मतदानासाठी प्रत्यक्ष न येता निवडणुक आयोगाच्या विविध पर्यायांचा देखील मी तपास केला व विचारणा केली. परंतु ते पर्याय उपलब्ध नसल्याचे राज्याच्या निवडणुक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. अखेर अतिशय व्यथित व जड अंत:करणाने मला मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय करावा लागला. या पोटनिवडणुकीत श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांना मतदान करावे, असे मी बारामतीकरांना पुन्हा एकदा आवाहन करतो.”

धन्यवाद !

मी १९६७ मध्ये लढविलेल्या पहिल्या निवडणुकीपासून बारामती मतदारसंघातील माझ्या मतदानाचा हक्क अखंडपणे बजावला. आता २०२६ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात महाराष्ट्राचे एक लाडके व लोकप्रिय नेते स्व. अजित पवार यांच्या दुर्दैवी, अपघाती निधनाच्या शोकात्म पार्श्वभूमीवर ही पोटनिवडणुक होत… — Sharad Pawar (@PawarSpeaks) April 21, 2026

Web Title: Baramati assembly bypoll 2026 political bigwigs gather for sunetra pawars final campaign push

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Baramati Politics
  • Maharashtra Politics
  • Sharad Pawar
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
1

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी
2

Mantralaya Staff Relieved Decision: मुख्यमंत्री कार्यालयाचा मोठा निर्णय ! ५७० कर्मचाऱ्यांची मूळ विभागात हकालपट्टी

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप
3

Maharashtra Breaking News Today 2026: नवी दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषदेचा बिगुल, बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस
4

पुण्याच्या विकासाला ‘स्पीड’! सुनेत्रा पवारांचा PMRDAला थेट आदेश; इनर रिंग रोड, मेट्रोसह पाणी-वाहतुकीवर मोठा फोकस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.