Photo Credit- Social Media
जालना : बीड हत्या प्रकरणामुळे राज्यामध्ये अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घुणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये दिरंगाई केल्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणामध्ये मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. बीडमधील सर्वपक्षीय मूक मोर्चामध्ये जरांगे पाटील सहभागी झाले होते. यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले आहे.
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रकरणातील मास्टर माईंड आरोपी वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्यामध्ये संबंध असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. धनंजय देशमुख यांना पोलीस ठाण्यामध्ये धमकवले जात असल्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना धमकी दिली होती. असे केले तर रस्त्यावर फिरु देणार नाही, अशी धमकी मनोज जरांगे पाटील यांनी दिली होती. त्यावर लक्ष्मण हाके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. यानंतर आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राजकीय बातम्या वाचा एका क्लिकवर
काय म्हणाले जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “आम्ही न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत. एका लेकीन बाप गमावलाय. लेकीला न्याय पाहिजे. त्यामुळे राज्यभर समाज रस्त्यावर उतरला आहे. आता यातून सुट्टी नाही. धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्यांनी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शांत राहा शांत राहा असं सांगत जाणून-बुजून त्यांनी हे केले. संतोष देशमुखांचा खून करून त्यांचं पोट भरलं नसेल तरी लोक न्यायसाठी रस्त्यावर येणार आहेत, असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगे पाटील यांनी घेतला आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आवाहन केले आहे. जरांगे पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्र्याच्या शब्दावरती मराठे शांत आहेत. आम्हाला लोक खूप त्रास देत आहेत. एकही आरोपी सुटला तर मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. त्यामुळे सर्वांना शिक्षा द्या. आरोपी पुण्यातच कसे सापडत आहेत. हे पळून आले आहेत. धनंजय मुंडेंनी हे सगळ थांबवावे. हाकेला मी कधीही विरोधक मानल नाही. मी त्यांच्या कुठल्याच जातीवर बोललो नाही”, असेही जरांगे पाटील यांनी म्हटलो आहेत.