Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस टंचाईवर CM देवेंद्र फडणवीसांचा मास्टरस्ट्रोक! महाराष्ट्र सरकारने घेतले ‘हे’ पाच निर्णय

युद्धाचा परिणाम म्हणून भारतामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही निर्णय जारी केले आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 13, 2026 | 11:50 AM
CM Devendra Fadnavis Maharashtra government issues regulations amidst the LPG gas shortage

CM Devendra Fadnavis Maharashtra government issues regulations amidst the LPG gas shortage

Follow Us
Follow Us:

मुंबई : आखाती देशांमध्ये युद्धस्थिती निर्माण झाल्यामुळे तेल, इंधन आणि गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. मध्य पूर्व भागातील या युद्धाचा परिणाम भारतावर देखील झाला आहे. अनेक राज्यांमध्ये एलपीजी गॅसची कमतरता निर्माण झाली आहे.  महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये व्यावसायिक गॅस (LPG Gas) मिळत नसून घरगुती गॅससाठी एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. यावर महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सामान्य लोकांना युद्धाचा फटका बसला असून गॅस सिलेंडर एजन्सीबाहेर रांगा लागल्या आहेत. यामुळे काळाबाजार होण्याची देखील शक्यता आहे.या स्थितीत राज्यामध्ये अनेक ठिकाणी रेस्टॉरेंट, हॉटेल आणि खानावळींचे नुकसान होते. कारण एलपीजी की कालाबाजारीने जोर पकडला आहे. ही परिस्थिती महाराष्ट्र सरकारने गॅस पुरवठा आणि समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

हे देखील वाचा : युद्धाचा सातारकरांना बसला फटका; एजन्सीबाहेर ग्राहकांच्या गॅससाठी भल्यामोठ्या रांगा

गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून काही सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे:

  • गॅस बुकिंग ॲप्स आणि मिस्ड कॉल सेवांमध्ये उद्भवणाऱ्या तांत्रिक समस्या त्वरित सोडवण्याबाबत तेल कंपन्यांना निर्देश देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त, राज्य, विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरांवर त्वरित नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम्स) स्थापन केले जातील; तसेच तक्रार निवारणासाठी ‘व्हॉट्सॲप’ सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.
  • आगामी धार्मिक सण आणि उत्सवांचा विचार करता, सार्वजनिक संस्थांना एलपीजी (LPG) सिलिंडर्सचा पुरवठा अखंडितपणे होईल, याची खात्री करण्यास प्राधान्य दिले जाईल.
  • गॅस सिलिंडर्सच्या पुरवठ्याबाबत नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारची घबराट निर्माण होऊ नये, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मदत घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
  • एलपीजीची वाहतूक करणाऱ्या वाहनांना, तसेच गॅस एजन्सींना आवश्यक ते पोलीस संरक्षण पुरवण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर सोपवण्यात आली आहे.
Maharashtra government says –🟢 Instructions have been issued to oil companies to immediately resolve the technical issues arising in gas booking apps and missed call services. Additionally, control rooms will be promptly set up at state, department, district, and taluka… pic.twitter.com/BeYpaabTcX — ANI (@ANI) March 13, 2026

हे देखील वाचा : दिलासादायक ! युद्धादरम्यानचं तेल संकट आता लवकरच दूर होईल; 32 देशांनी उघडले आपात्कालीन साठे

महाराष्ट्रातील परिस्थिती बिघडली

इस्रायल युद्धाचा थेट परिणाम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांवर होत आहे. रत्नागिरी आणि वाशिममध्ये कडक बुकिंग नियमांमुळे गॅस एजन्सीजबाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्या आहेत. ऑनलाइन बुकिंगच्या अभावामुळे लोकांना स्वतः रांगेत उभे राहावे लागत आहे. अमरावती आणि कोल्हापूरमध्ये सिलिंडर वितरणादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस संरक्षणात गॅस वितरण केले जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यावसायिक आता पारंपारिक चुली आणि लाकडावर अवलंबून आहेत, ज्यामुळे लाकडाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की भारत आणि इराणमध्ये राजनैतिक चर्चा सुरू आहेत.

Web Title: Cm devendra fadnavis maharashtra government issues regulations amidst the lpg gas shortage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Iran-Israel War
  • LPG Gas

संबंधित बातम्या

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात
1

Drought Inspection: दुष्काळी भागाच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्री मैदानात! फडणवीस मराठवाड्यात तर शिंदे विदर्भात

Maharashtra Today’s Live News in Marathi:  मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक
2

Maharashtra Today’s Live News in Marathi: मिक्स्ड मार्शल आर्ट्समध्ये सुचिका तारियालने जिंकले कांस्यपदक

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ
3

Devendra Fadnavis: मुंबईत UWA च्या इंडिया कॅम्पसचे उद्घाटन; शिक्षण-नवोपक्रमाला मिळणार जागतिक बळ

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन
4

Devendra Fadnavis On Marathwada: मराठवाडा ७ वर्षांत दुष्काळमुक्त करणार; देवेंद्र फडणवीसांनी सांगितला खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.