इराण इस्रायल युद्धाचा फटका साताऱ्यामध्ये गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
युध्दाची झळ जगभरातील सर्वच देशांना बसू लागली असून भारातालाही याचा फटका बसत आहे. देशातुन आखाती देशात जाणारा शेतमाल, व फळे ही बंदरावरच अडकून पडली असल्याने देशातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अशातच आता एलपीजी गँस वितरणावर या युध्दाचा गंभीर परिणाम झालेला पहावयास मिळत आहे, मोठ मोठ्या हॉटेल, इंटस्ट्रीजमध्ये वापरल्या जाणाऱ्या एल.पी.जी. गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्याने अनेक हॉटेल व्यावसायिक अडचणीत आले आहेत, तर अनेकांनी आपल्या हॉटेल बाहेर आता चुलीवरचे जेवण मिळेल असे फलक लावण्यात सुरुवात केली आहे. याचा परिणाम हा आज ना उद्या घरगुती गँस सिलेंडरवरही होईल अशी भीती सामान्य गॅस ग्राहकांना वाटु लागल्याने गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी सर्व एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा: मंत्रिमंडळानंतर आता विधानसभेची मोहोर? जाणून घ्या काय आहेत तरतुदी
म्हसवड शहरात असलेल्या शुभम भारत गँस एजन्सीबाहेर ही ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र असले. तरी अद्याप याठिकाणाहून एकाही गॅस ग्राहकाला सिलेंडर मिळाला नाही असे घडले नसल्याने गॅस ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. मात्र एजन्सी मार्फत घरपोच सिलेंडर वितरण सध्या थांबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गैर प्रकार होऊ नये यासाठी हा निर्णय एजन्सी चालकांनी घेतला असल्याचे समजते. मात्र ज्याप्रमाणे व्यावसायिक गॅस सिलेंडरची विक्री बंद झाली आहे त्याप्रमाणेच घरगुती गॅस सिलेंडर ही बंद होईल अशी भीती सर्वसामान्य गॅस ग्राहकांना वाटु लागल्याने गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी हे ग्राहक एजन्सीबाहेर गर्दी करु लागल्याचे दिसुन येते. अशातच गँस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनी गॅस वितरणात काही अटी घातल्याने सामान्य ग्राहकांचा अधिकच गोंधळ उडाला आहे.
हे देखील वाचा : “नमो नमो अन् जय श्रीराम म्हणा, गॅस आपल्या दारात; LPG गॅस तुटवड्यावरुन विरोधकांची बोचरी टीका
पूर्वी गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांना २१ दिवसांची अट होती ती आता शहरी भागासाठी २६ दिवसांची तर ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी ४५ दिवसांची केली आहे, तर प्रत्येक ग्राहकांची KYC ही कंपनी ने बंधन कारक केली आहे, ज्यांची नसेल त्यांचे बुकींगच होत नसल्याचे समोर येत आहे. तर प्रत्येक गॅस ग्राहकाला वर्षातुन १२ सिलेंडर दिले जातात त्याप्रमाणे ज्यांचे १२ झाले आहेत त्यांचेपण बुकिंग होत नसल्याचे दिसुन येते, मात्र गॅस ग्राहकाला याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांच्या गोंधळात अधिकच भर पडत आहे. ग्राहकांचा हा गोंधळ कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुढाकार घेत जिल्ह्यातील सर्व गॅस एजन्सीला योग्य त्या सुचना दिल्या आहेत, त्यानुसार जिल्हाधिकार्यांच्या सुचनानुसारच गॅस ग्राहकाला गॅसचा पुरवठा सुरु असल्याचे येथील एजन्सीच्या सुत्रांकडुन सांगितले जात आहे.






