खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकालमध्ये गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतले आहे. (फोटो - सोशल मीडिया)
उज्जैन : बारा ज्योतिर्लिंगामधील एक देवस्थान म्हणजे उज्जैनमधील महाकाल. या देवस्थानाला भाविकांची मोठी गर्दी होत असते. या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये जाऊन दर्शन घेणे किंवा पूजा करणे यावर बंदी घालण्यात आली आहे. केवळ पूजारी वर्गाला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजाअर्चा करता येते. मात्र सध्या नवीन वाद उफाळून आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी गाभाऱ्यामध्ये जाऊन देवाचे पूजा केली आहे. त्यामुळे ही बंदी फक्त सामान्यांसाठी असून व्हीआयपी लोक मात्र सहज आतमध्ये जात आहेत, असा घणाघात विरोधक करत आहेत.
सोशल मीडियावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यातील आहे. या व्हिडीओमध्ये गाभाऱ्यामध्ये व्यवस्थापन व काही पुजारी दिसत आहेत. त्याचबरोबर इतरही काही व्यक्तीही दिसत आहेत. यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या पत्नीदेखील असल्याचा दावा व्हिडीओवरून करण्यात येत आहे. यावरून सध्या वाद निर्माण झाला आहे. सामान्य भक्तांना गाभाऱ्यात जाऊन दर्शन वा पूजा करण्यास बंदी असताना व्हीआयपी लोक आणि राजकीय लोकांनी प्रवेश कसा दिला जातो? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. याची दखल उज्जैन प्रशासनादेखील घेतली असून महाकालेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाण्याची परवानगी नसताना प्रवेश कसा दिला याची चौकशी व्हावी असे निर्देश देण्यात आले आहेत.
Shrikant Shinde, son of CM Eknath Shinde was given entry into garba griha of Mahakaleshwar temple in Ujjain.
Temple authorities have ordered probe bcz no one is allowed entry into garba griha.
BJP dogs like @MrSinha_ & @rishibagree will keep mum since Hindu sentiments are not…— Khao Maa Kasam (@khaomaakekasam) October 19, 2024
हे देखील वाचा : माजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढणार?; थेट खासदारकीलाच मिळालं आव्हान
सदर व्हायरल व्हिडीओ नेमका कधीचा आहे, याबाबत खुलासा होऊ शकला नसला, तरी तो शुक्रवारी संध्याकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार महेश परमार यांनी टीका केली असून, “महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र असोत किंवा भाजपाचे इतर मंत्री किंवा नेतेमंडळी असोत, दादागिरी करून गाभाऱ्यात जातात. मला वाटतं की हे राजेशाहीत जगत आहेत. एकीकडे ज्यांच्या मतांच्या जोरावर हे खासदार-लोकप्रतिनिधी झाले, ते 50 फूट लांबून दर्शन घेतात. त्यासाठी 6 ते 8 किलोमीटर चालत येतात. त्यामुळे मला वाटतं हे 100 वर्षांपूर्वीच्या राजेशाहीत जगत आहेत. प्रभू महाकालेश्वर यांना सुबुद्धी देवो”, अशी टीका यांनी केली आहे.