झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. (फोटो - सोशल मीडिया)
EC Assembly Elections Poll Date Annoucemnt LIVE : रांची : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पत्रकार परिषद घेतली जात आहे. निवडणूक अधिकारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूका जाहीर केल्या आहेत. लवकरच झारखंड विधानसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक होणार आहे. याबाबत अधिकची माहिती देत उपलब्ध सोयी सुविधांची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला जम्मू काश्मीर व हरयाणा विधानसभा निवडणुकीतील कार्याबद्दल प्रशासनाचे व सर्व मतदारांचे अभिनंदन केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये शांततापूर्व वातावरणामध्ये निवडणूक पार पडल्यामुळे आपण करुन दाखवले अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. जम्मू काश्मीरच्या निवडणूका या ऐतिहासिक स्वरुपाच्या झाल्या. लोकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केले. या लोकशाही आणखी मजबूत झाली आणि ठेवली आहे. सर्वांत मोठा लोकशाही देश म्हणून भारत नेहमी एक पाऊल पुढेच जात आहे, अशा भावना राजीव कुमार यांनी व्यक्त केल्या आहेत.
राजीव कुमार यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्याबाबत उपलब्ध तयारी आणि संसाधन याबद्दल माहिती दिली. तसेच मतदारांसंबंधित आकडेवारी जाहीर केली. झारखंडची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले की, झारखंडमध्ये 24 जिल्हे आहेत. यामध्ये 81 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामध्ये जनरल 44 तर एसटीसाठी 28 आणि SC कोटासाठी 09 जागा राखीव आहेत. तसेच झारखंड विधानसभा मतदारसंघाचा कार्यकाळ 5 जानेवारी 2025 रोजी संपणार आहे. त्यापूर्वी झारखंडमध्ये निवडणूका लागणार आहेत.
झारखंडाच्या मतदारांची माहिती देताना ते म्हणाले की, 2.6 कोटी मतदार संख्या झारखंडमध्ये आहे. यामध्ये 1.29 कोटी महिला मतदार, 1.31 पुरुष मतदार आहेत. यामध्ये 11.84 लाख पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आहेत. 66.84 हे तरुण मतदार झारखंडमध्ये आहेत. यामध्ये 29,562 मतदान केंद्र असणार आहेत. 20 हजार 281 ठिकाणी ते असणार आहेत. यामध्ये 5 हजार 42 हे शहरी तर 24 हजार 520 हे गावाकडील मतदान केंद्र असणार आहेत. यामध्ये 1 हजार 271 हे महिलांकडून कार्यान्वित होणारे केंद्र असणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी झारखंड विधानसभा निवडणुकीच्या बाबत दिली आहे. निवडणूक आयोगानुसार झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा 13 नोव्हेंबरला तर दुसरा टप्पा 20 नोव्हेंबरला होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पहिल्या टप्प्यासाठी 28 ऑक्टोबर तर दुसऱ्या टप्प्यासाठी 30ऑक्टोबर दाखल करण्यात येणार आहे. तर 30 ऑक्टोबर व 01 नोव्हेंबर रोजी अनुक्रमे अर्जाची छाननी केली जाईल. तर पहिल्या टप्प्यातील उमेदवारांना 30 ऑक्टोबरपर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांना 01 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.