उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक आयोग राजीव कुमार यांच्याकडून आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर (फोटो - सोशल मीडिया)
Uttar Pradesh by elections : लखनऊ : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य अधिकारी राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. राजीव कुमार यांनी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रामध्ये येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. याची घोषणा करताना निवडणूक आयोगाने एकूण 15 राज्यांतील 48 विधानसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणूका जाहीर केल्या आहेत. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणूकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पोट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. 9 विधानसभा जागांसाठी उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. राजीव कुमार यांनी अधिकची माहिती दिली आहे. निवडणुक आयोगाच्या माहितीनुसार 9 जागांवर निवडणूक होणार असून त्याचबरोबर आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये देखील पोटनिवडणूक होणार आहे.
उत्तर प्रदेश पोटनिवडणूक
वरील दिलेल्या सर्व उत्तर प्रदेशातील जागांवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 10 पैकी 9 जागांवर 13 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची घोषणा अद्याप झालेली नाही. 23 नोव्हेंबर रोजी पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.