Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 13 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य सरकार घेणार ‘सरसकट’ कर्जमाफीचा निर्णय ? मुख्यमंत्री फडणवीसांसोबत होणार शिष्टमंडळाची बैठक

कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचा दावा करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरातील अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jun 15, 2026 | 05:05 PM
रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित !

रोहित पवारांचे अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित !

Follow Us
Follow Us:

राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेतील कथित जाचक अटी हटवण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. सरकारने या अटी-शर्तींचा पुनर्विचार करण्याची तयारी दर्शवल्यानंतर tयांनी हा निर्णय घेतला आहे.

याबाबत रोहित पवार यांनी ट्विट करत म्हंटले कि, सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही सरकारच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर सुरवातीला अटीशर्ती नाकारणारं सरकार आता या अटीशर्ती काढण्याबाबत तयार झालं, हे या आंदोलनाचं यश आहे.”

सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ यांचं नाव दिलं परंतु अटीशर्ती टाकल्यामुळं बहुतांश शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहणार होते आणि हा एकप्रकारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचाही अवमान आहे, ही गोष्ट पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरु करुन आम्ही… pic.twitter.com/RmmD1deg0q — Rohit Pawar (@RRPSpeaks) June 15, 2026

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी काल (रविवार, 14 जुन) आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. त्यानंतर येत्या पावसाळी अधिवेशनापूर्वी, म्हणजेच २२ जूनपूर्वी मुंबईत बैठक आयोजित करून कर्जमाफी योजनेतील जाचक अटी हटवण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले.

‘तृणमूल’ मध्ये बंडखोरीला नवे वळण, बंडखोर खासदार होणार नव्या पक्षात विलीन, NDA ला देणार पाठिंबा?

या आश्वासनानंतर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. महाराष्ट्रातील वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या नामदेव पायरी येथे महाआरती करून उपोषणाची औपचारिक सांगता करण्यात आली. यावेळी उपोषणकर्ते, वारकरी, शेतकरी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आपल्या ट्विटमधून ते म्हणाले, “आता सरकारने विठुरायाच्या पवित्र भूमीत येऊन कर्जमाफी योजनेतील अटीशर्ती काढण्याचा शब्द दिल्याने ते दिलेला शब्द पाळतील आणि राज्यातील शेतकऱ्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा आहे. परंतु मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर मात्र रस्त्यावरची मोठी लढाई लढणार, ही बाबही सरकारने लक्षात घ्यावी. या आंदोलनाला पाठिंबा दिलेले राज्यभरातील शेतकरी, महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष, विविध संस्था, संघटना, प्रत्यक्ष येऊन भेटलेले नेते, फोनवरून आणि सोशल मिडियातून पाठींबा दिलेले सर्वजण तसंच माझ्या पाठिशी खंबीरपणे उभं राहिलेलं माझं कुटुंब या सर्वांचेच मनापासून आभार!”

अधिवेशनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक होणार आहे. त्या शिष्टमंडळात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी खासदार राजू शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, शेतकरी नेते कॉ. अजित नवले, वामनराव चटप, महादेव जानकर, प्रवीण गायकवाड आणि रविकांत तुपकर यांचा समावेश असणार आहे.

‘दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा, स्वतःचे कार्यकर्ते मोठे करा,’ शर्मिला ठाकरेंचा पक्षफोडीवरून भाजप, आरएसएस वर निशाणा

Web Title: Farmer loan waiver conditions removal protest by rohit pawar suspended pandharpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • Farmer Loan Waiver
  • rohit pawar

संबंधित बातम्या

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा
1

Maratha Reservation : ‘मोर्चात गोळ्या घालण्याचा डाव,’ मनोज जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा, फडणवीस – शिंदे यांच्यावर निशाणा

Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटीसा..; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप
2

Manoj Jarange On ED Notice: मुंबईच्या आंदोलनापूर्वी मराठा आंदोलकांना ईडीच्या नोटीसा..; जरांगे पाटलांचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Wardha News : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर, जिल्ह्यातील ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांचा याद्या पोर्टलवर
3

Wardha News : शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर, जिल्ह्यातील ४३ हजार ७९९ शेतकऱ्यांचा याद्या पोर्टलवर

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन
4

कर्जमुक्तीच्या दुसऱ्या यादीत पुणे विभागातील 23117 शेतकरी; सहकारमंत्र्यांनी केले ‘हे’ आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.