Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 1 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News: ‘लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार’ नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप

Nashik News: नाशिक शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत पाच जणांचा मृत्यू झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मनपा प्रशासनावर गंभीर आरोप करत आयुक्तांनी जबाबदारी स्वीकारावी, असा इशारा दिला. खासदार राजाभाऊ वाजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दोषींवर कारवाईची मागणी केली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 01, 2026 | 11:49 AM
'लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार' नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप

'लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार' नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • नाशिकच्या खड्ड्यांवरून भुजबळांचा संताप
  • ‘पाच मृत्यूंना मनपा आयुक्त जबाबदार’
  • दोषींवर कारवाईची भुजबळांची मागणी
Nashik News Marathi: नाशिक शहरातील रस्त्यांना पडलेले खड्डे व अपघातात हकनाक जाणारे बळी, प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये
जबाबदारी टाळण्यासाठी सुरू असलेली टाळाटाळ लक्षात घेता शुक्रवारी (दि. ३१) सत्ताधाऱ्यांकडूनच संताप व्यक्त करण्यात आला. मंत्री छगन भुजबळ यांनी, लोकांच्या असंतोषाची वाट पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे हे विसरून चालणार नाही असा सज्जड दम भरत, शहराच्या दुर्देशेला महानगरपालिका आयुक्तच जबाबदार असून, त्यांनी याची जबाबदारी घ्यावीच लागेल, असा इशाराही दिला. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करून दोषींवर कारवाईची मागणी केली. नाशिकच्या दौऱ्यावर आलेले कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांना मनसेने घेराव घालून परिस्थितीला जबाबदार कोण? असा सवाल केला. (Nashik News Marathi)

Nashik Pothole Deaths: रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नाशिक हादरले; चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू, प्रशासनावर कायदेशीर कारवाईची तयारी

मनपाच्या हलगर्जीपणामुळेच पाच मृत्यू

शहरातील रस्त्यांच्या प्रश्नांवरून नागरिकांमध्ये सुरू असलेल्या असंतोषाचा कडेलोट होऊ लागला असून, आत्तापर्यंत रस्त्यांच्या कामांमुळे खड्डे पडून त्यात पाच जणांचा बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत, निरपराधांचे बळी जात असतांना प्रशासन सुरत आहे. त्यातून आता लोकप्रतिनिधीनाही जाब विचारला जात असल्याने त्याला मंत्री छगन भुजब (chhagan bhujbal) यांनी वाट करून दिली. प्रसार माध्यमांशी बोलतांना भुजबळ यांनी, मनपाच्या हलगर्जीपणामुळे पाच मृत्यू झाल्याचा आरोप केला. एकाला एक न्याय व दुसऱ्याला दुसरा न्याय असे चालणार नाही. या अपघातांची जबाबदारी कोणी तरी घ्यावीच लागेल. राज्यात उत्कृष्ट अधिकारी म्हणून प्रविण गेडाम यांची ओळख आहे, त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करावा, त्यांनी पुढाकार घ्यावा असा सल्लाही भुजबळांनी दिला.

महापालिकेचे अधिकार मला माहिती आहेत…

सुंदर नाशिकमध्ये जे काही चालले आहे, ते निषेधार्ह आहे अशा शब्दात तीव्र नाराजी व्यक्त करून, ज्यांच्यावर त्यांची जबाबदारी आहे तेच जर एकमेकांकडे बोट दाखवित असतील तर कोण कोणावर कारवाई करणार असा सवाल उपस्थित करून भुजबळ यांनी, महापालिकेला काय अधिकार असतात हे मला कोणी समजावून सांगण्याची आवश्यकता नाही. दोन वेळा मंबईचा महापौर होतो. शहरात एक वीट हलवायची असेल तरी महापालिका आयुक्तांची ती जबाबदारी आहे. अशा वेळी नाशिकसाठी कुंभमेळ्याच्या नावाखाली प्राधिकरणाचे नावे बोटे मोडून उपयोग नाही. महापालिका आयुक्तांना याची जबाबदारी घ्यावीच लागेल असे ठासून सांगितले.

मनसेचा मंत्री महाजनांना घेराव

शहरातीरस्त्यांच्या प्रश्नावर महापालिकेत अधिकाऱ्यांची बैठक घेण्यासाठी आलेले कुंभमेळामंत्री गिरीष महाजन यांना मनसेने घेराव घातला. दुपारी दिड वाजताच मनसेचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मनपात शहर अभियंत्याच्या दालनाबाहेर घोषणाबाजी केल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा आयुक्तांच्या दालनाकडे वळविला. ‘नाशिकचे खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे’, ‘आमदारांचे काही चालेना, गिरीष महाजन ऐकेना’ अशा घोषणांनी मनपा दणाणून सोडली. सुमारे तासभर चाललेल्या या घोषणाबाजीनंतर मंत्री गिरीष महाजन यांनी बाहेर येवून आंदोलकांशी चर्चा केली. अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत, अजून दोन, तीन महिन्यात परिस्थिती पुर्वपदावर येईल असे आश्वासन दिले. परंतु आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्यांनी दोषींवर कारवाई करा, मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटूंबियांना एक कोटी रूपयांची मदत करा अशी मागणी केली. यावेळी आंदोलकांनी बळी गेलेल्या पाचही व्यक्तींना महापालिकेतच श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, अंकूश पवार, मनोज घोडके, तुषार जगताप, ललीत वाघ, तुषार पाटील, प्रफुल्ल बेदरो, गणेश शेजवळ, मेघराज नवले, राहूल पाटील आदी उपस्थित होते.

Nashik Potholes: खड्डे की मृत्यूचा सापळा? खड्ड्याने घेतला उद्योजकाचा बळी; नाशिकमध्ये अपघातानंतर ठाकरे-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

Web Title: Nashik news marathi road potholes five deaths chhagan bhujbal slams municipal commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:49 AM

Topics:  

  • devendra fadnavis
  • MNS
  • Nashik

संबंधित बातम्या

Amit Thackeray Speech: ‘मी विसरलो, खरंच सुचत नाही…’, अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता
1

Amit Thackeray Speech: ‘मी विसरलो, खरंच सुचत नाही…’, अमित ठाकरे भाषणात अचानक थांबले, सभागृहात क्षणभर शांतता

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
2

Purandar International Airport साठी ६ हजार कोटींच्या कर्जाला मंजुरी; कामे वेळेत पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Maharashtra Govt  News: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे? महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश
3

Maharashtra Govt News: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे? महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा
4

Annabhau Sathe Memorial: अण्णाभाऊंच्या विचारांचे जागतिक ‘ज्ञानपीठ’ उभारणार; फडणवीस-शिंदे यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.